स्थानिक गुन्हा शाखेने विधीसंघर्षग्रस्त बालकासह तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघड केेले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एक विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत तीन जणांना पकडून दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्यांकडून दोन दुचाकी गाड्या आणि काही दुचाकी गाड्यांचे सुट्टे भाग असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक एस.व्ही. पुयड, सहकारी पोलीस अंमलदार गंगाधर कदम, रघुनाथ पोतदार, किशन मुळे, विलास कदम, गणेश धुमाळ, बालाजी कदम, संतोष बेल्लुरोड, संदीप घोगरे, अमोल घेवारे हे 5 जानेवारी 2025 रोजी शहरात गस्त करत असतांना बोंढार हवेली शिवारातील सर्व्हे नंबर 21 येथे त्यांनी गौस नासेर खान (30) रा.तेहरानगर नांदेड, मिनाज खॉ आलम खॉ पठाण (42) रा.देगलूर नाका यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यांनी मुदखेड, भाग्यनगर आणि नांदेड ग्र्रामीण अशा तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी गाड्या चोरल्या होत्या. या संदर्भाने त्यांच्याकडून दोन दुचाकी गाड्या आणि दुचाकीचे सुट्टे भाग असा 70 हजार रुपयांचा मुद्देमला जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!