दवाखान्यातून पळून आलेल्या खासदार प्रताप सारंगी यांना गाठून द न्युज गाईडचे पत्रकार अनुराग ओझा यांनी घेतलेल्या मुलाखतीत सारंगी सांगतात. मोदी खोटे बोलत आहे, सरकार खोटे बोलत आहे, मला विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी धक्का दिलेला नाही, मी खरे सांगून माझ्या शेवटच्या जीवनात सुखी राहु इच्छीतो असे सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीने लोकसभेत आमच्या खासदारावर राहुल गांधीने जिवघेणा हल्ला केला हे रचलेले नाटकच होते हे सिध्द झाले. भारतीय जनता पार्टी खोटारडी आहे यावर प्रताप सारंगी यांनी शिक्का मोर्तब केला.
जखमी अवस्थेत आयसीयुमध्ये भरती असलेल्या प्रताप सारंगी हे दवाखान्यातून बाहेर आल्याबरोबर अनुराग ओझाने त्यांना गाठले. अनुराग ओझा खा.प्रताप सारंगी यांना विचारत होते. राहुल गांधीला पण कळत नाही आपल्या बापाच्या वयाच्या खासदाराला धक्का देतात काय? यावर प्रताप सारंगी शटऍप म्हणाले आणि ओझाला सांगत होते की, राहुल गांधीने मला धक्का दिला नाही.. धक्का दिला नाही… धक्का दिला नाही…धक्का दिला नाही…मी राहुल गांधीला पाहिलेच नाही मग ते मला धक्का कसा देतील. डॉ.भिमराव आंबेडकर हे माझे नेते आहेत. माझ्या हृदयात आहेत. देशाच्या हृदयात आहेत. भारताच्या संविधानाच्या प्रत्येक पानावर डॉ.भिमराव आंबेडकरांचे नाव लिहिलेले आहे. त्यांच्या हाताला आणि डोक्याला बांधलेल्या पट्टीचे सविस्तर वर्णन करत ओझा म्हणाले की, अगोदर छोटीशी पट्टी होती, नंतर ती वाढली आणि आता सध्या तर सर्व डोक्याला पट्टी बांधली आहे. तेंव्हा सारंगी म्हणाले की, मी दवाखान्यातून पळून आलो आहे. मला प्रधानसेवकाने अर्थात नरेंद्र मोदी यांनी नाटक करायला सांगितले होते, म्हणून हे नाटक केले.
गोदी मिडीया वगळता मिडीया, सोशल मिडीया मला उघड करतील म्हणून मी तुमच्यासमोर सत्य सांगण्यासाठी आलो आहे. मी आता जाण्याच्या मार्गावर आहे यावर ओझा म्हणाले की, स्वर्गात जाणार आहात की, नरकात यावर सारंगी म्हणाले मला माहित नाही. मला जबरदस्तीने आयसीयुमध्ये टाकले. शिवराजसिंह चव्हाणसह अनेक मंत्री आले आणि माझे बोलणे मोदीशी करून देत होते. म्हणजे मी चांगला होतो. मला काही झाले नव्हते. तरी मला बळजबरी पलंगावर झोपवले आणि अनेक सलाईन लावले ज्याची मला कधी गरज नव्हती. मी केलेल्या नाटकामुळे माझे घरचे लोक सुध्दा मला नौटंकी म्हणत आहेत. माझ्या मतदार संघातील लोक परेशान आहेत. त्यावर ओझा म्हणाले आता पुढच्या निवडणुकीत हरणार नौटंकी केल्यामुळे. त्यावर सारंगी सांगतात मी हरलो तरी चालेल पण मी सत्य सांगतो आहे. मला कुठेच जखमी झाली नाही, माझ्या शरिरातून कोठूनही रक्त निघाले नाही. यावर ओझा म्हणाले तुमच्या खासदार कंगणा राणावत सांगतात की, खा.राहुल गांधी लोकसभेत आपले डोले दाखवतात. यावर सारंगी सांगतात भारतीय जनता पार्टीचे लोक विषारी बोलतात. अमित शाहने राजीनामा द्यावा. कारण खोटे जास्त दिवस टिकत नाहीत ते समोर येतेच म्हणून मी स्वत: तुम्हाला भेटून माझी बाजू मांडत आहे. राहुल गांधी एकदम उत्कृष्ट आणि सभ्य माणुस आहे. अमित शाहने अत्यंत त्वरीतगतीने राजीनामा द्यावा अशी मागणी प्रताप सारंगी यांनी केली आहे.
उडीसा राज्यात जन्मलेले प्रताप सारंगी हे अगोदर बजरंगदलाचे अध्यक्ष होते. काही वेळेस त्यांना उडीसा विधानसभेत स्थान मिळाले. सन 2014 आणि 2019 मध्ये ते खासदार पदाची निवडणुक हरले आहेत. पण 2024 मध्ये ते निवडूण आले. त्यांची एकूण संपत्ती 10 लाख रुपये आहे. म्हणजे मोदी यांच्या मंत्रालयात सर्वात गरीब मंत्री म्हणून त्यांचे नाव गुगलवर नोंदवलेले दिसते.
खा.राहुल गांधी विरुध्द असा नाटकबाज खासदार तयार करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करायला लावला. प्रियंका गांधीविरुध्द केरळ उच्च न्यायालयात त्यांचा निवडणुक अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी का एवढे गांधी परिवाराला घाबरतात हे खा.प्रताप सारंगी यांच्या सांगण्यणावरून सुध्दा दिसते. आपली झालेली चुक, आपण केलेेले नाटक कबुल करून खा.प्रताप सारंगी यांनी संपुर्ण भारत देशाची माफी मागितली आहे.
सोर्स: द न्युज गाईड-अनुराग ओझा.
सोबत व्हिडीओ लिंक…