नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भास्करराव देशमुख यांचे निधन झाले आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.
दि.24 डिसेंबर रोजी सकाळी डॉ.सुधिर देशमुख यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भास्करराव देशमुख रा.चिकाळा ता.मुदखेड यांचे निधन झाले. त्यांचे वय 87 वर्ष होते. त्यांच्यावर आज सायंकाळी 5 वाजता गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंतिमसंस्कार होणार आहेत. देशमुख कुटूंबियांच्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा सहभागी आहे.