लवकरच भारताचा नागरीक छोट्या-छोट्या कारणांसाठी देशद्रोही ठरवला जाईल असा कायद्या तयार होत आहे. त्या कायद्याची पहिली प्रयोगशाळा महाराष्ट्रात होणार आहे. कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीकडे असलेले बहुमत तो कायदा तयार करीलच. हा कायद्या तयार होईल तेंव्हा डॉ.बी.आर.आंबेडकर असले असते तर त्यांनाही देशद्रोही घोषित करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीची आहे. भारतीय जनता पार्टीने महापुरुषांविरुध्द गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. पंडीत जवाहरलाल नेहरुपासून सुरूवात करून पुढे इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी इतरपर्यंत आणले. या पैकी नक्कीच पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे महापुरूषच आहेत. या प्रयत्नांमध्ये गांधीला मागे पाडून नथुराम गोडसेचे गोडवे गाण्याची सुरूवात पण झाली होती. भारतीय चलन बदलले तेंव्हा मात्र महात्मा गांधीचाच फोटो नोटांवर छापण्यात आला होता. असाच प्रयत्न डॉ.बी.आर.आंबेडकरांविरुध्द केला. पण अमित शाहच्या सोळा सेकंदांच्या व्हिडीओने आज देशभरात आग लावून टाकली आहे. परवा अर्थात 25 डिसेंबर रोजी दरवर्षी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम होत असतो. पुन्हा एकदा या निमित्ताने संविधानप्रेमी आणि डॉ.बी.आर.आंबेडकर प्रेमींना आपले आंदोलन उग्र स्वरुपात दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
काही दिवसांतच जनसुरक्षा कायद्या अंमलात येणार आहे. या कायद्याच्या प्रस्तावात नक्षलवाद वाढला आहे असे नमुद केले आहे. महाराष्ट्रात तर नक्षलवाद वाढण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने अरबन नक्षलवाद असा एक शब्द प्रयोग सुरू केला होता आणि तो विरोधकांवर, विशेषकरून कॉंगे्रसवर आणि त्यातही विशेष राहुल गांधींवर प्रहार होता. अमित शाहच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती अधिकारात दिलेल्या एका उत्तराप्रमाणे सरकारच्या अभिलेखात अरबन नक्षलवाद असा काही शब्द उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. म्हणजेच अरबन नक्षलवाद आहे हे सांगणे खोटेच आहे. भारत जोडो यात्रेत 40 संस्था सहभागी झाल्या होत्या. म्हणजे त्या अरबन नक्षलवादी आहेत असा त्याचा अर्थ काढून जनसुरक्षा कायद्या आणला जात आहे आणि त्याची प्रयोगशाळा म्हणून तो कायद्या सर्वप्रथम महाराष्ट्रात लागू होणार आहे.
हा नवीन कायदा निवडणुक संदर्भाने सुध्दा एक नवीन नियम आणल्यानंतर जनतेला देशद्रोही म्हणण्यासाठी फायदेशीर ठरेल. जनतेचे मत, ज्यामुळे सरकार बनते, संपते आणि त्याचा हिशोब जनतेला दाखवायचा नाही म्हणजेच त्यात गोंधळ आहे आणि म्हणून नियम बदलला. नियम बदलून निवडणुक आयोगाला हे अधिकार दिले की, त्यांना आवडेल तेवढेच कागदपत्र त्यांनी मागणी करणाऱ्याला दाखवावे. सर्व कागदपत्र दाखविण्याची गरज नाही. म्हणजे निवडणुक आयोगाने केलेली घाण लपवता येईल. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक हा नियम बदलण्याअगोदर झालेली आहे. त्यामुळे तो त्यावर लागू नसेल असे म्हणतात येईल. पण सरकारच्या प्रत्येक कागदात असे लिहिले जाते की, सरकारला वाटले. याही संदर्भाने सरकारला वाटले आणि नवीन कायदा तयार झाला असे सुध्दा होईल. 1961 पासून आजपर्यंत 63 वर्ष निवडणुकीच्या संदर्भाने लागू असलेले नियम बदलून शासन जनतेवर दादागिरी करत आहे. मागे इसरायलकडून पेगासस ही तांत्रिक उपकरणे आणली होती. त्यामुळे देशातील नेते, पत्रकार, व्यवसायीक यांचे फोन हॅक करण्यात आले होते. पेगासस उपकरणे केंद्रीय मंत्रालयच खरेदी करू शकत होते. त्या संदर्भाची चौकशी समिती स्थापन झाली. पण त्या चौकशी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. पेगाससच नव्हे त्या शिवाय इतर अनेक तांत्रिक उपकरणे खरेदी करण्यात आली होती. ती कोणती आहेत याचा आजही देशाला माहित नाही. विरोधी पक्ष हा दुर्बल असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीचे फावत आहे. या सध्याच्या परिस्थितीत डॉ.बी.आर.आंबेडकर उपस्थितीत राहिले असते तर भारतीय जनता पार्टीने त्यांनाही देशद्रोही दाखविले असते. कारण संविधान तयार करतांना डॉ.बी.आर.आंबेडकर म्हणाले होते. आरएसएस हे विषारी झाड आहे आणि त्या विषारी झाडावर येणारी फळे सुध्दा विषारीच असतील. दरवर्षी 25 डिसेंबर रोजी संविधानप्रेमी आणि डॉ.बी.आर.आंबेडकर हे ज्यांची श्रध्दा आहेत असे सर्व जण मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम करतात आजही राजस्थानच्या जयपुर उच्च न्यायालयासमोर मनुचा पुतळा आहे. तो काढला पाहिजे. मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमातील आंदोलनाची तिव्रता आणखी उच्च व्हायला हवी. तरच भारतीय संविधानाचे रक्षण होईल.
अमित शाहने डॉ.बी.आर.आंबेडकरांबद्दल बोललेले शब्द नक्कीच ओघात झालेली चुक नाही. तर ती जाणून बुजून, ठरवून, स्क्रीप्ट तयार करून बोललेले शब्द आहेत. डॉ.बी.आर.आंबेडकरांनी बौध्द धम्म स्विकारल्यानंतर सावरकरांनी त्यांच्या विरुध्द सात ते आठ लेख लिहिले होते. त्यात अत्यंत घाणेरड्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ही बाब पत्रकार अशोक दुबे यांनी लिहिलेल्या पुस्तकात नमुद आहे. 1920 मध्ये महात्मा गांधीनी सुध्दा एकदा मनुस्मृतीवर बोलतांना ही पुस्तक स्विकारायची नाही कारण ती काही खरी पुस्तक नाही, त्यात बरेच बदल केलेले आहेत असे म्हटले होते.
जखमी अवस्थेतील खासदार प्रताप सारंगी यांच्याबद्दल उपचाराची माहिती देतांना डॉक्टरांनी सांगितले होते की, यांचे सर्व काही ठिक आहे. पण यांना दवाखान्यातून सुट्टी देण्याचा निर्णय वरिष्ठ डॉक्टर घेतील. पण एएनआय या संस्थेने या व्हिडीओमध्ये बदल केला आणि प्रताप सारंगीला दवाखान्यातून सुट्टी देण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असा बदल करून तो प्रसारीत केला. कारण एएनआयही बीजेपीचीच संस्था आहे. म्हणजे कसा खोटा प्रचार करण्यामध्ये बीजेपी पुढे असते हे स्पष्ट होते. अमित शाह हे जैन समाजाचे व्यक्ती आहेत. ते स्वत:ला वैष्णव म्हणतात पण ते जैनच आहेत. जैन या समाजाला अल्पसंख्याक या प्रवर्गात मोजले जाते आणि खरे तर डॉ.बी.आर.आंबेडकरांचेच धन्यवाद अमित शाहने व्यक्त करायला हवे. पण ते अमित शाह डॉ.बी.आर.आंबेडकरांच्या नावाला आजचे फॅशन म्हणतात. हे त्यांचे दुर्देव की, देशाचे दुर्देव. आदील शाह आला होता, अहमद शाह आला होता, कुतूब शाह आला होता आज आमित शाह आहे त्यांचाही शेवट इतर शाह प्रमाणे होईलच.
वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावर चर्चा झाली तेंव्हा खा.सुप्रिया सुळे यांनी त्या विधेयकाबद्दल बोलतांना हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावे अशी आयडीया अमित शाहला दिली. अशा विरोधी पक्षांकडून इतर विरोधकांनी दक्ष राहायला हवे. नसता त्याच दिवशी वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाची वाट लागली असती. नागपूरमध्ये बोलतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीतील युवक सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू त्यांना असलेल्या अस्थमाच्या त्रासाने झाला होता. पण सोमनाथ सुर्यवंशीचे पोस्टमार्टम अहवाल शरीराच्या बाहेरील आणि शरीराच्या आतील अनेक जखमांमुळे शॉक लागून मृत्यू झाला असे सांगते. काय म्हणावे मग खरे काय, किंवा खऱ्याला लपविले जात आहे काय? भारतात अशी एक म्हण प्रसिध्द आहे की, आपण आकाशावर थुंकलो तर तेच थुंक आपल्या तोंडावर पडते याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.
सोर्स:पीसीएच, अशोक दुबे, राजू परुळेकर.
नांदेड येथील कवी शैलेश कौठेकर सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर आपल्या कवितेतून आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त करतात.
लवकरच भारतातील जनतेला देशद्रोही म्हणण्यासाठी नवीन कायदा
त्यांना हवी मनुस्मृती
नको आहे संविधान
स्वप्न त्यांचे पुरे करण्या
करतील ते काही प्रावधान
त्यांना हवी जातीयता
उच्च निच पध्दती
रहावे प्रत्येकाने पायरीने
चालावी अशी जनरीती
बाबासाहेबांचे संविधान
मनात त्यांच्या सलते
कसे दुर करावे
विचार मंथन चाले भलते
कवि:-शैलेश कवठेकर,नांदेड