एका जुगारअड्‌ड्याकडून रेड मागितली, दुसरा जुगार अड्डा सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने गुलामांची बातमी छापल्यानंतर पोलीसांनी एक कार्यवाही दाखवली आहे. प्राप्त माहितीनुसार सोमवारी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप नांदेडच्या कार्यालयात येणार आहेत. कारण उद्या खा.राहुल गांधी नांदेडमार्गे परभणीला जाणार आहेत. एखादी कार्यवाही दाखवली म्हणजे उद्देश पुर्ण होत नसतो ती पळवाट असते. एका फंक्शन हॉलच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्यावर सुध्दा गोदावरी नदीच्या काठी गुलांमाचा दुसरा कट्टा लागलेलाच आहे.
वास्तव न्युज लाईव्हने माळटेकडीच्या पुलाखाली वाहनतळ करून फार्महाऊसवर चालणाऱ्या जुगारासंदर्भाने बातमी प्रकाशित केल्यानंतर पोलीस विभागाने त्यांच्याकडून एक रेड घेतली आणि आम्ही कार्यवाही केल्याचा अभिलेख तयार केला. म्हणतात ना पोलीस खाते करील ते होईल. ठिक आहे एक कार्यवाही तर झाली.
या जुगार अड्‌ड्याच्या जवळच पुलाच्या शेजारून नदीकडे जाणाऱ्या जंगलात सुध्दा एक जुगार अड्डा सुरू आहे. या जुगार अड्‌ड्याकडे भरपूर सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली होती. जंगल असतांना त्याला तार कंपाऊंट करून गेट लावण्यात आले होते. मागे एकदा काही पोलीस अधिकाऱ्यांनी तो जुगार अड्डा पुर्णपणे उध्दवस्त केला होता. परंतू पुन्हा एकदा तोही जुगार अड्डा जोरदारपणे सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!