नांदेड(प्रतिनिधी)-वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते गणवेशात असतील त्याच वेळेस राजशिष्टाचार(गार्ड ऑफ ऑनर) देण्यात यावा अशा प्रकारचे परिपत्रक नागपूर शिबिरातून पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ.छेरींग दोरजे यांनी जारी केले आहेत.
राजशिष्टाचार पाळणे ही एक समारंभीय कृती आहे. त्यामुळे पोलीस गणवेश परिधान न केलेल्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांना गार्ड ऑफ ऑनर देणे राजशिष्टाचार आणि गणवेशाचे पावित्र राखणे या विषयी ते उच्चीत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस घटकांचा आढावा घेण्यासाठी येतात तेंव्हा तसेच विविध कार्यक्रमांच्या वेळी व इतर महत्वांच्या प्रसंगी भेट देतात तेंव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत असतो. नव्याने 20 डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात डॉ.छेरींग दोरजे यांनी घटक प्रमुखांना सुचित केले आहे की, गणवेशात नसतांना गार्ड ऑफ ऑनर देण्याचे टाळावे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुध्दा स्वत: गणवेशात नसतांना गार्ड ऑफ ऑनर घेण्याच्या पध्दतीला टाळावे.