नांदेड(प्रतिनिधी)-राहेर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनीज काढण्यासाठी वापरण्यात आलेले तराफे, प्लॉॅस्टीकचे पाईप आणि प्लॉस्टीकच्या टाक्या असे साहित्य नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड आणि कुंटूर पोलीसांनी संयुक्तरित्या जाळून टाकले आहे.
20 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, महसुल विभागातील काही कर्मचारी, पोलीस ठाणे कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील, पोलीस अंमलदार व्ही.डी.निकम आदींनी राहेर गावातील गोदावरी नदी काठी अचानक पोहचले. त्या ठिकाणी गोदावरी नदीपात्रातून अवैध गौण खनीज अर्थात वाळु काढली जात होती. महसुल पथक आणि पोलीसांना पाहुन वाळू काढणारी मंडळी पळून गेली.पण पोलीसांनी तेथे असलेले तराफे, प्लॉस्टीकचे पाईप आणि प्लॉस्टीकच्या टाक्या असे 5 ते 6 हजार रुपयांचे साहित्य जाळून टाकले आहे.