नांदेड,(प्रतिनिधी)-म्हणतात ना आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळत असतात. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पोलीस उप महानिरिक्षक नांदेड परीक्षेत शहाजी उमाप यांच्याशी चर्चा केल्यानंतर परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले आहे.
10 डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची परभणीत विटंबना झाली. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया आली, प्रतिक्रिया आल्यानंतर पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केले. त्यानंतर आंदोलन झाले आणि काही जागी दगडफेक आणि जाळपोळ झाली. यानंतर दलीत वस्त्यांमध्ये शिरून पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन केले. महिला, लहान बालके, वृद्ध यांना पण घाणेरडी वागणूक देत घर बंद करा बाहेर फिरू नका अशा धमक्या देऊन अनेक जणांना मारहाण केली.त्यातील एक जवळपास 55 वर्षीय महिला रडून रडून अशोक घोरबांड आणि इतर काही लोकांचे नावे सांगत होती ज्यांनी त्या महिलेला मारहाण केली होती.
या संदर्भाने आंदोलकांनी अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती. आज सकाळी त्या मागणीला यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या दोषी पोलिसांवर कार्यवाही होईल असे सांगितले आणि पोलीस उप महानिरीक्षकांशी बोलून जी कांही चर्चा झाली त्यानंतर परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या निलंबनाचे आणि विभागीय चौकशीचे आदेश पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सुद्धा अशोक घोरबांड यांच्या निलंबनाची आणि विभागीय चौकशीची घोषणा केली.
जैसे ज्याचे कर्म फळ देतो रे ईश्वर….