आज एक फॅशन झाली आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर म्हणण्याची असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बी.आर.आंबेडकरांचा केलेला अपमान देशाने सहन केलेला नाही. त्यासंदर्भाने सत्य सांगण्याची हिंम्मत नसल्याने अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेवून कॉंगे्रस पक्षावर आरोप केला की माझ्या वक्तव्याला तोडून-मोडून प्रसारीत केले जात आहे. आपले सर्व वक्तव्य ऐकले तरी त्यातील अर्धवट सांगितलेले सत्य आणि जोडलेला खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे. भारतीय जनता पार्टीची शंभरी अमित शाहच्या बोलण्यामुळे भरेल असे चित्र तयार होत आहे.
परवा दि.17 डिसेंबर रोजी राज्य सभेत संविधान हिरक महोत्सवावर बोलतांना अमित शाह यांनी सुरूवातच आंबेडकरांचे नाव घेवून केली. सहा वेळेस आंबेडकरांचे ज्या पध्दतीने नाव उच्चारले खरे तर तो व्हिडीओ वैद्यवैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठवायला हवा म्हणजे. शाहच्या बोलण्याचा टोन प्रयोगशाळा बरोबर काढील आणि त्यानंतर त्यांनी केलेले वक्तव्य कसे आहे. याची स्पष्टता समोर येईल. शाहच्या वक्तव्यानंतर लोकसभा, राज्यसभा आणि देशभर याचा विरोध झाला. कॉंगे्रस नेते मल्लीकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेवून अमित शाह यांनी राजीनामा द्यावा किंवा नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्री पदावरुन बरखास्त करावे अशी मागणी केली. देशभर झालेल्या आंदोलनांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे राज्य आहे. त्या-त्या ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात प्रभात पांडे आणि मिरदुल इस्लाम या दोन कॉंग्रेस युवा नेत्यांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी पत्रकार परिषद घेवून अमित शाह यांनी कॉंगे्रसवर आरोप केला की, माझे वक्तव्य तोडून-मोडून कॉंग्रेस दाखवते आहे आणि त्यांची हिच निती पुर्वीपासून सुरू आहे. खरे तर अमित शाह यांचे पुर्ण वक्तव्य ऐकले तर हे लक्षात येते की, नेहरु बद्दल वाईट सांगण्याच्या नादात मी अपमान डॉ.बी.आर. आंबेडकरांचा करतो आहे हे त्यांना कळलेच नाही किंवा ही स्क्रिप्ट तयार होती आणि ही स्क्रिप्ट तयार असेल तर हा संविधान बदलाचा पहिला भाग आहे. नंतर मात्र नरेंद्र मोदींनी सुध्दा ट्विटकरून अमित शाह यांच्या वक्तव्याचे समर्थनच केले. हे सुध्दा अत्यंत दुर्देवी आहे. खरे तर अमित शाह यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, डॉ.बी.आर.आंबेडकरांनी तयार केलेले संविधान नसते तर काय झाले असते, ते कधीच मंत्री झाले नसते असो. डॉ.बी.आर.आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन नसून त्यांच्या विचारांचे अवलंब आहे. त्यांचे विचार जनतेत सांगतांना त्यांचे हजारदा नाव घ्यावेच लागेल.
डॉ.बी.आर. आंबेडकरांनी नेहरु यांच्या कॅबिनेटमधून राजीनामा दिला हे सांगतांना डॉ.बी.आर.अंाबेडकरांनी अनुसूचित जाती-जमातीच्या बद्दल त्यांच्या मागणीप्रमाणे काही होत नाही, कलम 370 त्यांना पसंत नव्हते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. याचा अर्थ आज विरोधी पक्ष डॉ.बी.आर.आंबेडकरांचे नाव घेवून ढोंगी पणा करत आहेत हे अमित शाह यांचे पुर्ण वक्तव्य पण ज्या पध्दतीने त्यांनी आंबेडकर-आंबेडकर असे नाव सहा वेळेस उच्चारले आणि त्या अगोदर फॅशन म्हणाले हा आंबेडकरांचा अपमानच आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक काळात राहुल गांधी आपल्या हातात लाल रंगाची कोरी पुस्तक घेवून हिंडतात असा उल्लेख केला होता. अमित शाह यांना हे आठवत नाही काय? ही पुस्तक तयार करणाऱ्याने सर्व प्रथम ती पुस्तक त्यांनाच भेट दिली होती. मग तिला लाल आणि कोरी पुस्तक म्हणता मुळात ते भारताचे संविधान आहे.आपल्या शब्दांना उच्चारुन आंबेडकरांपेक्षा एवढ्यावेळेस देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असे सांगितले. हा स्वर्गाचा शब्द मुळात मनुस्मृतीचा आधार आहे. म्हणजे तुम्हाला संविधान बदलायचे होतेच म्हणूनच तुम्ही 400 पार जागा मागत होतात. हे आता स्पष्ट झाले आहे. या महिन्यातच 16 डिसेंबर रोजी बुलंद शहरमध्ये एका दलित सैनिकाने पोलीस महिलेशी विवाह केला तेंव्हा घोडीवर बसला होता. त्यावर हल्ला झाला. मध्यप्रदेशच्या दामोहमध्ये 11 डिसेंबर रोजी एक दलित युवक बग्गीत बसला म्हणून बग्गी, बग्गीवाला आणि घोडा यांच्यावर जमावाने हल्ला केला. गुजरातमध्ये सुध्दा घोडीवर बसल्याच्या कारणावरून एका दलित नवरदेवाला मारहाण झाली. यासोबतच हातरचमध्ये घडलेल्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी तेथे भेट दिली. याच्याबद्दल तुम्ही वाईट बोलता शाह साहेब पण उत्तर प्रदेश शासनाने त्या कुटूंबाला विस्तापित करून पुर्नप्रस्थापित करण्याचा शब्द दिला होता. त्यालाही आता चार वर्ष झाली आहेत. काय चुकले राहुल गांधीचे आणि हे सर्व आंबेडकर भक्त आहेत. खरे तर पुर्ण भारत देश आंबेडकरांचा भक्त आहे. पण अन्याय झालेल्या भक्तांबद्दल बोलतांना डॉ.बी.आर.आंबेडकरांचे नाव उच्चारायचे नाही काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो. फॅशन कशाला म्हणतात हे समजून घ्यायचे असेल तर आठवा अमेरिकेत ओबामाशी भेटायला जातांना नरेंद्र मोदी यांनी पुर्ण सुटवर मोदी-मोदी असे नाव लिहिले होते. नंतर राहुल गांधींनी टिका केली आणि त्यानंतर त्या सुटचा लिलाव करण्यात आला. डॉ.बी.आर.आंबेडकरांनी पहिला कॅबिनेटमधून राजीनामा दिला हा अभिलेखच आहे. परंतू हे अमित शाह सांगत नाहीत. संविधान समितीमध्ये तीन वर्ष काम करतांना पंडीत जवाहरलाल नेहरु आणि बी.आर.आंबेडकर यांच्यामध्ये अनेक मुद्यांवर वादही झाले असतील. पण त्यांनी सोबत काम करुन संविधानाला आकार दिला आणि त्याचा स्विकारपण केला.
आरएसएस, जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीने अनेकदा नेहरु विरुध्द पटेल असा देखावा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसबद्दल काय बोलले होते. हे भारतीय जनता पार्टी विसरली काय? सरदार पटेल यांनी डॉ.आंबेडकरांसोबत हिंदु राष्ट्र या अवधारणेला विरोध केला होता हे शाहंनी वाचले नाही का? डॉ.बी.आर.आंबेडकरांचे पाकिस्तान या भारत का विभाजन या 1945 मध्ये प्रसिध्द झालेल्या पुस्तकाच्या पान क्रमांक 354 आणि 355 वर लिहिले आहे. हिंदु राष्ट्र बनले तर मोठी आपत्ती येईल आणि त्यास रोखले पाहिजे. आंबेडकरांचे हे शब्द आमित शाहने वाचले नाहीत काय? अर्धवट माहिती देवून अपप्रचार करणे हा त्यांचाच धंदा आहे. आजच्या परिस्थितीत अनेक जण हिंदु राष्ट्र निर्माण असे व्यासपिठावरून सांगतात. त्यांना कधी तुम्ही रोखले काय, त्यांना भारतीय संविधानाचा अर्थ समजून सांगला काय, डॉ.बी.आर.आंबेडकरांचे विचार प्रस्तुत केले काय? सरदार पटेल यांनी 1950 मध्ये सांगितले होते की, हिंदु राष्ट्र हा वेडे पणाचा विचार आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष राज्य आहे.
खरे तर डॉ.बी.आर.आंबेडकरांनी हिंदु कोडबिल पास झाले नाही. याच्या निषेधार्थ राजीनामा दिला होता. पण लोकसभेत आपले भाषण करतांना त्यांनी जरुर अनुसूचित जाती-जमाती आणि कलम 370 चा उल्लेख केला होता. पण राजीनाम्यात असे लिहिले नाही. डॉ.आनंद तेलतुंडे यांनी डॉ.बी.आर.आंबेडकरांची जीवनी लिहिली आहे. त्यात हे नमुद आहे. रामचंद्र गुहा यांची एक पुस्तक आहे, इंडिया आफ्टर गांधी यामध्ये आरएसएसने हिंदु कोडबिलचा विरोध केला होता. अनेक आरएसएस नेत्यांनी हिंदु कोडबिल ऍटम बॉम्ब आहे असे म्हटले होते. हिंदु कोडबिल पास झाले तर नेहरु सरकार पडेल अशी चर्चा त्यावेळी होती. हा भाग अमित शाहंना माहित नाही काय? रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकात हिंदु कोडबिलसाठी विरोधकांनी त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरु आणि डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे पुतळे जाळले होते असा उल्लेख आहे.
12 सप्टेंबर 1949 रोजी डॉ.बी.आर.आंबेडकरांनी हिंदु कोडबिल पास झाले नाही या कारणासाठीच राजीनामा दिला होता. पंडीत नेहरु यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बी.सी.रॉय यांना लिहिलेले पत्र दाखवून आंबेडकरांबद्दल विरोधकांचे प्रेम सांगत असतांना आपल्याच गर्वात त्यांनी आंबेडकरांचा अपमान केला. त्याच दिवशी पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी डॉ.बी.आर.आंबेडकरांना लिहिलेले पत्र सुध्दा अभिलेखात आहे. ते पत्र शाहंना दिसले नाही काय? त्यामध्ये नेहरु सांगतात आपण राजीनामा दिला आहे. ते काही दिवसांपुर्वी मला वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातम्यांमुळै कळले. त्या अगोदर एकदा आपण लिहिलेल्या पत्राप्रमाणे आपली तब्बेत ठिक नाही असे आपण म्हटले होते. तरी आज आपला राजीनामा त्वरीत मंजुर करावा अशी आपली मागणी आहे. पण माझ्या मते आपण सादर केलेले अनेक बिल आणि प्रस्ताव अजून चर्चेसाठी आलेले नाहीत. तेंव्हा त्या चर्चा पुर्ण होईपर्यंत आपण थांबावे अशी माझी इच्छा आहे.
आपल्यासोबत काम करतांना अनेक मुद्यांवर विरोध झाला होता. पण आपण केलेल्या चांगल्या कामांची प्रशंसा करणे हा माझा दृष्टीकोण आहे. मला अत्यंत दु:ख होत आहे, आपल्या राजीनाम्यामुळे कारण हिंदु कोडबिल पास झाले नाही ही संसदेतील नियमावली आाणि संख्या बळ यामुळे होते. तरी पण मी आपण सुरू केलेल्या कामांना पुढे स्वत: पाहिल आणि त्यांना पुर्ण करून घेईल.
डॉ.बी.आर.आंबेडकर पहिल्या कॅबिनेटमध्ये नाराज होते. याला कोणीच नाकारणार नाही. पण त्यांनी दिलेला राजीनामा, लोकसभेत केलेले भाषण यांना तोडून मोडून राजकारणाच्या सोयीसाठी वापरलेल्या शब्दांमुळे अमित शाह यांनी आपल्या स्वत:च्याच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या गोलमध्येच चेंडू फेकून दिला आहे. आयआयटी आणि आयआयएम मध्ये 90 टक्के शाखा पुर्णपणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. म्हणजे आजही 75 वर्षानंतर ही डॉ.बी.आर.आंबेडकरांना अपेक्षीत काम होत नाही. त्या संस्थांमध्ये आरक्षीत समुहाला जागा मिळत नाही. केंद्र सरकारच्या सचिवालयामध्ये किती अनुसूचित जाती-जमातीचे सचिव आहेत. याचा आकडा अमित शाहने दाखवावा. त्यानंतर डॉ.आंबेडकरांची स्मारके वाचून शाहंनी सारवासारव केली. पण नवीन लोकसभेच्या प्रांगणात डॉ.बी.आर.आंबेडकरांचा पुतळा कोठे बसविण्यात आलेला आहे. हे अमित शाहने सांगितले नाही. डॉ.बी.आर. आंबेडकरांचा पुतळा मागच्या बाजुला नेण्यात आलेला आहे. यावर अनेकक खासदारानंी आक्षेप पण घेतलेला होता.
सन 2013 मध्ये इंदु मिलची जागा मनमोहन सरकारने एमएमआरडीला देण्यासाठी मंजुर केली होती. त्या जागेवर सन 2015 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुमिपुजन केले. त्यानंतर दोन वर्षांनी सन 2017 मध्ये ही जागा एमएमआरडीच्या ताब्यात मिळाली हे त्यांच्या संकेतस्थळावर लिहिलेले आहे. डॉ.बी.आर.आंबेडकरांची स्मारके बहन मायावती यांनी सुध्दा बनवली. महाराष्ट्रात डॉ.शंकररराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदात असलेल्या सरकारने 22 खंडांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकरांचे न प्रसिध्द झालेले पत्र, विचार त्यांनी लिहिलेले लेख प्रकाशित केलेले आहेत. त्यामुळे कॉंगे्रस डॉ.बी.आर.आंबेडकरांची विरोधक आहे असे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याच पायावर धोंडा मारुन घेतला आहे.
-रामप्रसाद खंडेलवाल