नांदेड(प्रतिनिधी)-भगवान श्री दत्तात्रयाच्या जन्मोत्सदिनी माहुर गडावर पुणे आणि आहिल्यानगर जिल्ह्यातील दोन चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे आणि त्यांच्या पथकाने 2 लाख 75 हजार 800 रुपये किंमतीचे 39.400 ग्रॅम सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत.
दि.14 डिसेंबर रोजी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या येथील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांना भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवनिमित्त माहूर येथे पाठविले. त्यांच्यावर अशी जबाबदारी देण्यात आली होती की, माहुरच्या मालकाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतील. त्यामुळे होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी भाविकांचे दागिणे चोरू नये. गोविंदराव मुंडे आणि त्यांच्या पथकाने ही जबाबदारी पार पाडत अभि बालाजी कांबळे (24) रा.अण्णाभाऊ साठेनगर इंदापूर जि.पुणे आणि करण नारायण दिनकर (25) रा.कसबा ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर या दोघांना पकडले. या दोघांकडून 39.400 ग्रॅम सोन्याचा पोहे हार किंमत 2 लाख 75 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला. या संदर्भाने पोलीस अंमलदार सुरेश घुगे यांनी माहुर पोलीस ठाण्यात अहवाल सादर केल्याप्रमाणे दोन्ह चोरट्यांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा क्रमांक 175/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस महानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरज गुरव यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरिक्षक गोविंदरावजी मुंडे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, रुपेश दासरवाड, संजीव जिंकलवाड, भिमराव लोणे आदींचे कौतुक केले आहे.