परभणी (प्रतिनिधी)-परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांची अंतिमक्रिया झाल्यानंतर फुले-शाहु-आंबेडकर विचारांचे परभणी येथील कणखर नेतृत्व विजयदादा वाकोडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याला परभणीकारण म्हणता येईल काय?
परभणी येथे 16 डिसेंबर रोजी आंदोलनातील मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या अंतिमक्रियेत सहभागी झाल्यानंतर आंबेडकरी विचाराने अनेकांची झोप उडवणारे परभणी येथील विजयदादा वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. परभणी येथे शांतता समितीची बैठक बोलवली तेंव्हा त्यांनी प्रशासनाला सुनावलेले शब्द न विसरता येण्यासारखे आहे. अशा ढाण्या वाघाच्या निधनाने परभणीकरांना दुसरा झटका बसला आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा वाकोडे कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे.