केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खा.राहुल गांधींच्या चरित्र्य हत्येचा प्रयत्न केला

हिंदी भाषेत एक म्हण आहे, “भैस के आगे बिन बजाओ भैस खडी पगुराये’ या म्हणीचा अर्थ असा आहे की, म्हशी समोर बासरी वाजवली तरी ती आपली उभी राहुन गवत खात राहते. त्याचे चर्वण करते आणि तिच्या तोंडातून लाळ गळत राहते. असाच काहीसा प्रकार संविधान हिरक महोत्सवात भाषण करतांना सत्ताधिशांचा झाला. भाषण करत होते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आता त्यांच्या प्रश्नाचे काहीच उत्तर देता आले नाही म्हणून एका विक्री झालेल्या चॅनलच्या कार्यक्रमात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधी यांची चरित्र हत्या करण्याचा घाणेरडा प्रकार केला आणि त्या चॅनेल पत्रकाराने सुध्दा अत्यंत मिटमिट्या मारत अमित शाहच्या बोलण्याला प्रतिसाद दिल्याचे पाहिल्यानंतर कुठे गेली रे ती पत्रकारीता असेच म्हणावे लागत आहे.
संविधान हिरक महोत्सवात संविधानाबद्दल बोलतांना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाभारतातील एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांनी त्याचा अंगठा कापून घेतला याचा किस्सा सांगितला. त्याचप्रमाणे तुम्ही अनुसूचित जाती, जमाती, मागासलेले व्यक्ती, अति मागासलेले व्यक्ती, कामगार, कष्टकरी, कलाकार यांचे कसे अंगठे कापून घेतले. याची सुंदर जोडणी करून सांगितली. पण हिंदी भाषेतल्या म्हणीप्रमाणे ऐकणाऱ्यांना ते काही कळलेच नाही. उलट मुर्खासारखे आम्हाला अज्ञानी माणसाकडून नवीन ज्ञान भेटले असे मुर्खपणाचे वक्तव्य सत्ताधारी पक्षाकडून होत होते. राहुल गांधी यांनी सांगितलेला एकलव्याचा किस्सा मनुस्मृतीला जोडून होता. कारण मनुस्मृतीप्रमाणे आदीवासी असलेल्या एकलव्याला ब्राम्हण असलेले द्रोणाचार्य धर्नुविद्येचे शिक्षण देवू शकत नाहीत. कारण ते उच्च जातीच्या असलेल्या राजपुतांना शिक्षण देत होते. तसा नियम त्यावेळी होता. अर्थात त्यावेळी मनुस्मृतीच संविधान होते. आजच्या परिस्थितीत आम्ही ज्या संविधानाने देश चालवितो आहोत. ते संविधान आम्हाला अशी परवानगी देत नाही. आमच्या संविधानानुसार जात, धर्म यांना स्थान नाही. पण म्हणतात ना तुम्ही मुर्ख माणसांसमोर काही जरी बोललात तर त्यांना कळत नाही आणि कळालेच तर त्यांना उमगत नाही असेच काहीसे एकलव्याच्या किस्यात झाले. राहुल गांधी यांनी गुरूशिवाय त्यांच्या प्रतिमेसमोर तपस्या करून एकलव्य मोठे धर्नुधर झाले असे वक्तव्य केले.तपस्येचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी विचारल्यावर राहुल गांधी यांनी उर्जा तयार होणे असे उत्तर दिले. या वक्तव्यावर सुध्दा मोदी मिडीयाच्या व्हाटसऍप युनिव्हरसिटीचे कुलगुरू अमित मालविय यांनी त्याची थट्टा उडवली. पण वाचकांनी आमच्या बोलण्यावर विश्र्वास करू गुगल सर्च करा आणि तपस्या संस्कृत शब्दाचा अर्थ शोधा. कोणत्याही शब्दांचे तीन लिंग आहेत. त्यातील तपस्या हा नपुसक लिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ उर्जेपासून तयार झालेला तो असा आहे. पण सत्ताधारी पक्षांच्या अतिविलक्षण विद्वानांना हे कळलेच नाही. म्हणूनच आम्ही लिहिलेल्या हिंदी म्हणीला या परिस्थितीत मोठा अर्थ आहे. आपण एखाद्या मॅकेनिककडे गेलो आणि माझी गाडी बंद आहे असे सांगितले. तर तो 2-4 मिनिटे त्या गाडीचे निरिक्षण करतो आणि आपल्या हातात हातोडी घेवून एका जागी हाणतो. लगेच गाडी चालू होते. मॅकेनिक आपल्याला 100 रुपये मागतो. तेंव्हा मॅकेनिकचे उत्तर महत्वपुर्ण आहे. तो सांगतो मी हातोडी मारल्याचा एकच रुपया आहे. परंतू 99 रुपये यासाठी आहेत की, ती हातोडी कोठे मारायची आहे, किती दबावाने मारायची आहे याचे आहेत. अर्थात त्याने सुध्दा तपश्चर्या करूनच हे ज्ञान मिळवलेलीे आहे. फक्त भगवे कपडे घालून गुफेत बसून, डोळे मिटून ईश्र्वराचा पाठलाग करणे म्हणजे तपश्चर्या नव्हे. शेतकरी सुध्दा तपश्चर्याच करतो. शेअरमार्केटमधील लोक सुध्दा तपश्चर्या करतात. गवंडी सुध्दा तपश्चार्या करतो असा त्या तपस्येचा अर्थ आहे. हिटलरच्या सैन्यात गोबेल्स नावाचे एक सेनापती होते. त्यांच्या समोरून एक टॅंक गेला तर त्या टॅंकमधील कोणत्या भागाच्या कोणत्या नटमध्ये आवाज येत आहे असे ते सांगत होते. ही सुध्दा तपश्चर्याच आहे.

Oplus_0

इंडिया टुडे या प्रसार माध्यमातील आज तक या वृत्तवाहिनीने भारताचे गृहमंत्री अमित शाह यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीला अँकर राहुल कवल यांनी शब्दांकन दिले. या प्रसारणाच्यावेळी इंडिया टुडे गु्रपच्या मालकीन सुध्दा तेथे हजर होत्या. भारताच्या संसदेचे सत्र सुरू असतांना विदेशातून राहुल गांधी काही तरी आणतात आणि त्याचा उपयोग लोकसभेत करतात. हे सांगत असतांना अमित शाह यांनी वेगवेगळे टी-शर्ट घालून ते विदेशात का जातात तुम्हाला माहित आहे काय असे म्हणाले. अँकर राहुल कवलने अनेक मिटक्या मारत का जातात..का जातात असे विचारले. तेंव्हा अमित शाहने सर्व जगाला माहित झाले आहे तुम्हाला कसे नाही माहित म्हणून विचारणा केली आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीकडे जात दाखवून त्याच्याकडे माईक द्या असे म्हणाले.अँकरने लगेच त्या व्यक्तीकडे माईक दिला आणि फक्त 6 शब्दांमध्ये त्या अनोळखी व्यक्ती राहुल गांधीची चरित्र हत्या केली. तो व्यक्ती म्हणाला, विदेश मे कोई रहता है मिसेस या सहा शब्दांना उच्चारतांना त्याने स्वत:चे नाव सांगितले नाही, अँकरने त्याला विचारले नाही. काय दिसते यावरून आपल्या तोंडून राहुल गांधीची चरित्र्य हत्या करण्यापेक्षा अमित शाहने दुसऱ्याच्या हाताने ती करायला लावली. आजही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासोबत काम केलेले अनेक जण जीवंत आहेत. पण कधीच राहुल गांधीचे लग्न झाले आहे याबाबतीवर चर्चा झालेली नाही. जे काही आज तकने घडविले ती लिखित स्क्रिप्ट होती अशा पध्दतीने पत्रकारीता चालणार असेल तर त्यापेक्षा मोंढ्यामध्ये हमाली करून सुध्दा भरपूर पैसे मिळतात असे आम्हाला म्हणायचे आहे. खा.राहुल गांधी विरुध्द असे त्यांचे लग्न झाले असल्याची अवई उठवून त्यांचे सभासद पद रद्द करण्याचा हा एक डाव असू शकतो. पण हे करत असतांना हे पण लक्षात ठेवायला हवे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदा मी विवाहित आहे असे शपथ पत्रात लिहिले होते. यापुर्वी ते तिनवेळा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या शपथ पत्रात मात्र त्यांनी सुध्दा अविवाहितच लिहिलेले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे निवडणुक जिंकण्याचे तंत्र जाणतात. त्याचा उल्लेख राजदीप सरदेसाई यांनी लोकसभा 2024 वर लिहिलेल्या पुस्तकात आहे. 1982 मध्ये कॉलेजची निवडणुक लढवितांना त्यांनी केलेला प्रकार त्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेला आहे. अमित शाह यांनी शक्कल लढवली की, सर्व मुलींनी एकत्रीतपणे आपल्या विरोधकाला मतदान दिले तर तो जिंकेल म्हणून त्यांनी दोन दिवसांत सर्व मुलींच्या पालकांना फोन लावून मतदानाच्या दिवशी कॉलेजमध्ये राडा होणार आहे तेंव्हा मुलींना मतदानासाठी पाठवू नका असे सांगितले आणि त्याप्रमाणे मुली मतदानाला आल्या नाहीत आणि अमित शाह जिंकले.
राहुल गांधीवर घाणेरडे आरोप करतांना भाजपला हे का लक्षात राहत नाही की, आम आदमी या राजकीय पक्षात असलेल्या कपील मिश्राने दिल्लीच्या विधानसभेत मोदींवर किती घाणेरडे आरोप केले होते. तरी पण त्याला तुम्ही का पोसता आहात. याचे उत्तर फक्त भाजप देवू शकेल. कारण आता कपिल मिश्रा भारतीय जनता पार्टीत आहेत. पश्चिम बंगालचे खा.अभिजित गांगुले यांना खा.राहुल गांधीच्या दंडांवर आक्षेप आहे. किती मुर्खपणाचा हा विषय आहे. आपल्या तब्बेतीचे लक्ष ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खा.गांगुली यांनी लोकसभेत बोलण्यापेक्षा स्वत: आपली तब्बेत, आपले दंड राहुल गांधीपेक्षा चांगले करून घ्यावेत त्यावर कोणाला काय आक्षेप असू शकतो. ज्या बालकांनी आपला गल्ला खा.राहुल गांधी यांना दिला त्यांच्या आई-वडीलांनी आत्महत्या केली. ती मुले सांगत आहे की, ईडीच्या त्रासामुळे आमच्या आई-वडीलांनी आत्महत्या केली. याला काय म्हणावे.
लोकसभा-राज्यसभा ही देशाच्या भल्यासाठी आणि भारतीय जनतेच्या सुविधांसाठी चर्चा करण्याची जागा आहे. तेथे मुद्यांचे बोलायला हवे. तेथे नुसत्या फालतू गोष्टी सुरू आहेत. पत्रकारांसमोर गोदरा कांडानंतर बोलतांना भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, आजच्या परिस्थितीत राज धर्म पाळणे महत्वाचे आहे आणि नरेंद्र भाई ते करतील. बरे झाले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज धर्म पाहण्याअगोदर देवाघरी गेले आहेत.
सोर्स:- अनिल शर्मा, अजित अंजुम, दिपक शर्मा, अखिलेश स्वामी, अभिसार शर्मा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!