नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वाडी (बु) येथे असलेल्या जागृत हनुमान मंदिराजवळ एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे.
गिरजा राजेश केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आणि त्यांचा मुलगा हे 12 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता दवाखान्यात गेले होते. 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता परत आले तेंव्हा त्यांच्या घरातील किचन खिडकीच्या काही विट्टा काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे 1 लाख 60 हजार 500 रुपये किंमतीचे आणि 70 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 632/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.