नांदेड – ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांचा ‘नादारीचा सातबारा’ हा कवितासंग्रह म्हणजे इमानदार शेतकरी जीवनाचा पाढा आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या मनाचा ठाव या कवितासंग्रहातून त्यांनी घेतला आहे असे उद्गार डी. के. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य अजय क्षीरसागर यांनी काढले.
लोहा जि. नांदेड येथील राष्ट्रमाता अध्यापक महाविद्यालयात ‘वाचनाचे शाब्दिक परावर्तन’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते शंकर वाडेवाले हे होते. याच कार्यक्रमात कवी शंकर वाडेवाले यांच्या ‘नादारीचा सातबारा या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ केशव इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर वाडेवाले तथा इसाप प्रकाशनाचे संचालक श्री दत्ता डांगे, विशेष अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. अजय क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
प्राचार्य अजय क्षीरसागर व प्राचार्य केशव इंगोले यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. प्रास्ताविक इसाप प्रकाशनाच्या संचालकांनी केले. शंकर वाडेवाले यांनी आपल्या लिखाणामागच्या प्रेरणा व भूमिका सांगितली तर प्राचार्य क्षीरसागर व प्राचार्यसूत्र संचालन : सौ. गंगा बाबर सौ. रुक्मिणी बाबर
इंगोले यांनी ‘नादारीचा सातबारा’मधील कवितांचे वैशिष्ट्ये सांगितली.
प्राचार्य डॉ. केशव इंगोले यांनी शंकर वाडेवाले यांच्या कवितासंग्रहाने शेतकऱ्याची झालेल्या अवहेलना व्यक्त केली असून याबाबत व्यवस्थेला विचारलेले प्रश्न, मनाचा ठाव घेतात तसेच समाजमनाला आसूड ओडल्यासारखे चिंतन करण्यास भाग पाडतात असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गंगा बाबर व सौ. रुक्मिणी बाबर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. एच. काचगुंडे, प्रा. सौ. प्रज्ञा कल्याणकर, माधव इंगोले, शिवाजी जामगे, दीपक हिलाल यांनी परिश्रम
घेतले.