नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड बसस्थानकात बसमध्ये प्रवेशाची गर्दी एका महिलेला महागात पडली. तिच्या गळ्यातील मनीमंगळसुत्र चोरट्यांनी न कळत काढून घेतले आहे. दि. 10 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता नांदेड बसस्थानकामध्ये काशीबाई माणिकराव हंगरगे (70) वर्ष या लातूरला जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करत असतांना त्यांचे वय, बसमध्ये जाण्याची घाई आणि गर्दी या संधीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र 45 हजार रुपये किंमतीचे काढून घेतले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 598/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार येमेकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 752 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बँकेत एक लाख रुपये जमा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे पैसे चोरले शहरातील विनायक नगर भागात कंपाउंड मधले चंदनाचे झाड चोरले