नांदेड- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
छाननीनंतर नांदेड लोकसभेसाठी 39 उमेदवार वैध तर विधानसभा निवडणुकीसाठी 460 उमेदवार वैध
* लोकसभेसाठी 2 तर विधानसभेसाठी 55 उमेदवार अवैध* 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेता येणार…
भंडारी कुटूंबियांकडे सापडले 200 कोटी पेक्षा जास्तचे घबाड
नांदेड(प्रतिनिधी)-अक्षय तृतीयेची पहाट होण्याअगोदरपासून तीन भंडारी बंधूच्या विविध आस्थापना आणि घरे आयकर विभागाने तपासली त्यातत…
विधानसभेसाठी 10, 11, 17 व 18 ऑगस्टला विशेष मतदार नोंदणी अभियान
जिल्हयात 27.21 लाख मतदार ; तुम्ही त्यात आहे काय ? खातरजमा करा दावे व हरकती…