ओरडून ओरडून बोलणारे धनकड हाता हात जोडत आहेत

भारताच्या 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राज्यसभेच्या सभापती अर्थात अध्यक्षांवर अविश्र्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. काल पर्यंत आपल्या घरचे घरगडी असल्यासारखी वागणूक ते सदस्यांना देत होते आता ते हात जोडायला लागले आहेत. का यावी अशी वेळ भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने असे का करावे आणि नंतर हात का जोडावे. यापेक्षा आपल्या जीवनातील नेहमीचीच ठेवणी असावी. कोणत्या पदामुळे त्यात बदल करायची गरज नसते आणि बदल केलाच तर हा जोडायची वेळ येते. एवढे मात्र नक्की.
भारतामध्ये सर्वप्रथम क्रमांक राष्ट्रपतींचा आहे, दुसरा क्रमांक उपराष्ट्रपतींचा आहे, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष तथा सभापती असतात. सध्या या आसनावर जयदीप धनकड विराजमान आहेत. भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेवून अध्यक्ष पदाचे कामकाज चालविणे अयोग्य आहे. बहुदा जयदीप धनकड यांना राष्ट्रपती व्हायचे आहे. त्या आशेतून त्यांनी राज्यसभेत आपलीच दादागिरी चालविलेली होती. विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या घरातील घरगडी असल्यासारखी वागणूक ते नेहमीच देत होते.खासदार जया बच्चन, खा.सोनिया गांधी, खा.मल्लीकार्जुन खरगे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांना बोललेले शब्द धनकडसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून अपेक्षीतच नव्हते. बरेच वेळेस तेथे असलेल्या कॅमेऱ्यांचा विषय, माईक बंद करण्याचा विषय यावर सुध्दा अत्यंत खालच्या स्तरावर बोलून धनकड यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा कमीच केली. सत्ताधारी पक्षांच्या खासदारांना बोलण्याची संधी, विरोधी पक्षांच्या खासदारांना त्याचे उत्तर देण्यासाठी सांगून तो खासदार बोलण्यासाठी उभा राहिला की, सभागृह तहकुब अशा पध्दतीने वागणूक देत त्यांनी राज्यसभेचा कारभार चालविला होता.
या चुकीच्या पध्दतीमुळे भारतीय जनता पार्टीशिवाय राज्यसभेत असलेले सर्वच खासदार नाराज होते. तेंव्हा त्यांनी एकत्रीतपणे अविश्र्वास ठराव आणण्यासाठी आपसात चर्चा केली आणि अविश्र्वास प्रस्ताव तयार केला तेंव्हा 50 खासदारांचे स्वाक्षरी आवश्यक असतांना त्यावर जवळपास 80 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावरून धनकड यांच्या प्रतिमेची कल्पना आपल्याला करता येईल. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही सभागृहाच्या अध्यक्षावर अशी वेळ यावी ही पहिलीच वेळ आहे. त्यातही तांत्रिकता बऱ्याच आहेत. जसे अविश्र्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ आवश्यक असतो. सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन 14 दिवसांच्या अगोदर संपणार आहे. किंबहुना शासनाच्यावतीने त्या अगोदर सुध्दा अधिवेशन संपविण्यात येईल. परंतू जयदीप धनकड यांची केलेली अवस्था पाहता दुसऱ्या दिवशी पासून सभागृहात त्यांची वागणूकच बदलली. ते विरोधी पक्षांच्या खासदारांना ज्यांना त्यांनी अत्यंत घाणेरडी वागणूक दिली. त्यांच्यासमोर सुध्दा ते आत जोडत आहेत.
प्रत्येकाच्या जीवनात अशी वेळ येते की, त्याच्याकडे भरपूर अधिकार असतात. त्या अधिकाऱ्यांचा दुरुपयोग करू नये असे सर्व धर्मांच्या शिकवणूकीत सांगितलेले आहे. तरी पण जयदीप धनकडला ही बाब न कळावी. आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार आपण पुर्ण दमात वापरतो. पण त्याच बरोबरीने संविधानाने आपल्याला जबादाऱ्यापण दिल्या आहेत. जबाबदाऱ्यांकडे मात्र आपण बेमालुमपणे किंबहुना जाणूनू बुजून दुर्लक्ष करीत आहोत. पण आपण केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आपल्यावर असा होतो की, पुन्हा आपल्याला त्यासाठी हात जोडावे लागतात. धनकडांच्या परिस्थितीचा अहवाल मांडतांना आम्ही सर्वसामान्य माणसाला सुध्दा हे कळावे की आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करू नये म्हणूनच हा शब्द प्रपंच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!