नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेची निवडणुक झालीच तर तथा कथीत नेता आणि शिक्षक पत्रकार संघटनेच्या निवडणुकीत पैशांचा महापुर आणणार काय?

रामप्रसाद खंडेलवाल

नांदेड-काही दिवसांपुर्वीच विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. त्यामध्ये वाहिलेला पैशांचा पुर पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मन्याड खोऱ्याचा वाघ (तथा कथीत नेता तथा शिक्षक)पुन्हा उळणार काय ? अशी चर्चा काही दिवसांपुर्वी जिल्हा पत्रकार संघटनेच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झाली. या बैठकीत खाण्यापिण्याची सोय सुध्दा होती, ती सोय कोणी केली होती. याचा पत्ता मात्र लागत नाही.

लोकशाहीमध्ये पत्रकार हा विषय खुप आदराने फक्त बोलला जातो. पण त्यात असणाऱ्या वेगवेगळ्या त्रुटींना दुर्लक्षीत केले जाते. त्यामुळे एकंदरीतच पत्रकार हा विषय लोकशाहीला मजबुत करणारा एक खांब आहे असे बोलले जात असले तरी त्यातील फोलपणा अनेकदा उघड होतो. काहींना 500 माझे 500 माझ्या साहेबांचे यामुळे नोकरी गमवावी लागली. काही जणांना 5हजारांची जाहिरात दिले तरच बातमी लागते. यासाठी त्या पैसे मागणाऱ्यांवर व्यवस्थापनाने वॉच लावला. पत्रकारीता करतांना ज्याचा आवाज जगात कोठे पोहचू शकत नाही. तो आवाज उदंड करणे ही सर्वात मोठी जबाबदारी असतांना काही दमड्यांच्या नादात फक्त पदे पाहिजेत अशीच पत्रकार संघटनेची मांडणी सुरू झाली आहे. यामुळे पत्रकारांची अवस्था सुध्दा दयनिय होत आहे.हा भाग नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेचाच नसून भारतात सर्वत्र असेच सुरू आहे. कोणी कोणाच्या पे रोलवर काम करत आहे. तर कोणी मी नाही त्यातली असे दाखविण्याचा प्रयत्न करतांना चांगल्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही काही पत्रकारीता नव्हे. आम्ही अनेकदा स.आदत हसन मंटो यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांचे शब्द वाचल्यानंतर अत्यंत दुर्देवी प्रकार या पत्रकारीता क्षेत्रात घडत असल्याचा अनुभव त्यांनी 1950 च्या दशकात मांडलेला आहे.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या निवडणुका संदर्भाने राज्य अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एक निरिक्षक नांदेडला पाठविला होता. या निरिक्षकासमोर नांदेड जिल्हा पत्रकार संघटनेचा अध्यक्ष बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेकांनी तालुक्यातून आपल्या समर्थकांना बोलावले. मुळात पत्रकार संघटनेचा विषय आहे तेंव्हा संघटनेत असणाऱ्या सर्व 500 सदस्यांना बोलवायला हवे होते. ज्यांनी मागच्या वर्षी सदस्य होते. त्यांचे नवीन अर्ज घेवून, त्यांची फिस भरून त्यांना पुन्हा नियमित करायला हवे होते. कारण संघटनेमध्ये काम करतांना कोणीही फिस भरण्याची तारीख आठवण ठेवील असे होते नाही. तेंव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती तारीख त्यांना आठवण करून द्यावी लागते आणि सर्वच संघटनांमध्ये असे चालते. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने असे केले असते तर ते काही नवीन होणार नव्हते. ही परिस्थिती नेहमीसाठी कायम आहे.

परवा झालेल्या निवडणुकीच्या बैठकीत हासण्यासारखा प्रकार असा आहे की, याच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने नांदेड जिल्ह्याच्या 16 तालुक्यांमध्ये पत्रकार संघटनांच्या निवडणुका घेतल्या. त्यासाठी नांदेडहून पदाधिकारी जात होते. मोठा गाजा-वाजा केला जात होता आणि मग ती तालुक्याची निवडणुक पार पाडली जात होती. पण जिल्हा संघटनेची निवडणुक मात्र तालुक्यात जाऊन हार-तुरे स्विकारणाऱ्यांना बिनविरोध हवी आहे. का बरे असे व्हावे. इतरांचे शेत शिवार भिजवतांना आपलेच वाफे कोरडे का ठेवावे. या राज सोनाळे यांच्या शब्दांप्रमाणे आपणही त्यात पुर्णपणे सहभागी व्हावे. आपल्या येथे सुध्दा निवडणुक घ्यावी आणि जो सक्षम असेल त्या व्यक्तीला संघटनेचे सदस्य मतदान येतील. काही जणांनाच वारंवार हे पद का भोगावे वाटते. इतरांमध्ये ती पात्रता कधीच जन्म घेवू नये असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने पत्रकार संघटनेत सुध्दा हुकूमशाहीच चालावी असाच त्याचा अर्थ होतो. खरे तर ज्यांनी या पदाचा उपभोग घेतला आहे. त्यांनी तर कधीच या पदाकडे पाहण्याची गरज नाही. सध्या निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेल्या परिस्थितीत पैशांचा वाहिलेला पुर मन्याड खोऱ्यातील वाघ (तथाकथीत नेता तथा शिक्षक)नांदेडच्या जिल्हा पत्रकार संघटना निवडणूकीत उडवू इच्छीतो काय? हा ही प्रश्न या निमित्ताने चर्चेला आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!