नांदेड(प्रतिनिधीस)-बदक छाप पत्यांवर तिर्रट नावाचा जुगार खेळतांना नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांना पकडे आहे आणि पाच जण पळून गेले आहेत. पकडलेल्या चौघांकडून 2260 रुपये रोख रक्कम आणि 2 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या पकडल्या आहेत.
पोलीस अंमलदार ज्ञानेश्र्वर केशव कलंदर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 डिसेंबरच्या दुपारी 5 वाजता गाडेगाव रस्त्यावरील आलु कांदा बाजाराच्या पाठीमागे जंगलात पोलीस पथकाने धाड टाकली तेंव्हा तेथे काही जण जुगार खेळत होेते. पोलीसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये शेख अमजद शेख खादर (29) रा.हबीबीया मस्जीदजवळ खुदबेईनगर नांदेड, शेख अजहर शेख रौफ (29) रा.खुदबेईनगर, महम्मद सुबान महम्मद खाजा (52) रा.खुदबेईनगर चौक नांदेड, मिर्झा इनायत तुल्ला बेग एकबाल बेग(39) मिल्लतनगर गाडेगाव रस्ता नांदेड या चार जणांना पकडले. त्या ठिकाणचे इतर पाच मात्र पळून गेले. पकडलेल्या चौघांकडून 2260 रुपये रोख आणि 2 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या असा 2 लाख 22 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 9 जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 1137/2024 दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ,खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, गुन्हा शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.