नांदेड(प्रतिनिधी)-आठवडी बाजारांमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पकडून देगलूर पोलीसांनी 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त केले आहेत.
दि.7 डिसेंबर रोजी देगलूरच्या भाजीपाला मार्केटमध्ये हरी मारोती चाकोते यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्या प्रमाणे पोलीसांनी आपल्या माहितीनुसाार प्रमोद उर्फ पिंटू श्रीपती सोनकांबळे (39) रा.धडकनाळ ता.उदगीर जि.लातूर यास पकडले. त्याच्याकडून चोरलेले दोन मोबाईल किंमत 18 हजार रुपयांचे जप्त करण्यात आले. त्यातील एक मोबाईल हरी मारोती चाकोते यांचा आहे. या कार्यवाहीसाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, संकेत गोसावी यांनी देगलूरचे पोलीस निरिक्षक मारोती मुंडे, पोलीस अंमलदार कृष्णा तलवारे, मलदौडे, सगरोळीकर, मोटार्गे आणि बुंगई याचे कौतुक केले आहे.