भगवान सोमनाथाच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याचा अहवाल आपण का दाबून टाकला

ध्या भारतात धार्मिक विषयांवर अभ्यासक्रम तयार करून त्यातून मते मिळविण्याचा डाव वेगवेगळ्या कारणांनी फिरत आहे. पण सन 2020 मध्ये आलेल्या भगवान सोमनाथांच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याच्या अहवालावर सुध्दा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यवाही करायला हवी पण असे घडलेले नाही. डिसेंबर 2020 मध्ये आलेला सोमनाथ मंदिराचा अहवाल का दाबून ठेवण्यात आला आहे. याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी देशाला देणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंाच्याच आदेशाने सन 2020 च्या जानेवारी महिन्यात सोमनाथ मंदिराची पुरातात्वीक तपासणी करण्याचे ठरले. मुळात भारतीय ईतिहासप्रमाणे मोघलांनी सोमनाथ मंदिराची विटंबना अनेकदा केलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.राजेंद्र प्रसाद, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पहिले पंतप्रधान पडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने सोमनाथ मंदिराचे पुर्ननिर्माण करण्यात आले होते. सध्या भारतात खोदकाम करून त्यातील धार्मिक पध्दतींना अडचणीत आणण्याचा चॅप्टर सुरू आहे. सध्याच्या युगात असा कल झालेला आहे की, असे धार्मिक चॅप्टर वेगवेगळ्या कारणांनी सुरू करायचे आणि आपल्याला त्या चॅप्टरमुळे कशी मते मिळतील यावर लक्ष केंद्रीत करायचे. आपल्याला त्या चॅप्टरमधून मिळवण्याचे इप्सीत साध्य झाल्यावर तो चॅप्टर बंद आणि नवीन चॅप्टर सुरू.
असे चॅप्टर का चालत आहेत. त्याचे सर्वात मोठे कारण भारताच्या लोकांना काम जास्त नाही. भरपूर वेळ आहे आणि त्यावेळेचा उपयोग ते अशा चॅप्टरवर खर्च करतात. असे आहे तर भारतात बुलेट ट्रेन किंवा वंदे भारत रेल्वे गाडी चालविण्याची गरज काय? अशा पध्दतीच्या गाड्या त्या लोकांना हव्या आहेत. ज्यांच्याकडे वेळ नाही. पण असे आम्ही करतो आहोत हे दाखवतांना वेगवेगळ्या जागी खोदकाम करून नवीन चॅप्टर सुरू केले जातात. भारतात दरडोई उत्पन्न कमी होत आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. भारताच्या युवकांना योग्य शिक्षण मिळत नाही. या प्रश्नांकडे जनता जाऊ नये म्हणून असे खोदकामाचे चॅप्टर तयार केले जातात आणि मुळ मुद्यांपासून जनतेचे लक्ष त्याकडे ओढले जाते आणि धार्मिक चॅप्टर सुरू राहतात.
विदेशांमध्ये युध्द से बुध्द, बुध्द आणि गांधी यांच्यावर बोलतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शांतीचा संदेश देत आहेत असे दाखवतात.पण त्यांच्या राज्यात ज्या राज्यावर त्यांनी तिन वेळा मुख्यमंत्री पद भूषवले. तेथे बुध्द अवतरीत झाले आहेत. पण त्याकडे मोदींचे लक्ष नाही. त्याही पेक्षा मोठे दुर्देव असे आहे की, सन 2019 च्या जानेवारी महिन्यात त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्यांच्या राज्यातील देवाधी देव महादेव भगवान सोमनाथाच्या मंदिराची पुरातात्वीक तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी जीपीआरटी (ग्राऊंड पेनीट्रेशन रडार टेक्नॉलॉजी) या पध्दतीचा अवलंब करण्यात आला. त्यासाठी 5 कोटी रुपयांची मशीन खरेदी करण्यात आली. या तपासणीसाठी आयआयटी गंाधीनगर यांच्यासह चार तांत्रिक सदस्य आणि संपूर्ण पुरातत्व विभाग गुंतविण्यात आले. या तपासणीतील मशिनमुळे जमीनी खाली 12 मिटर खोलपर्यंत काय आहे हे विना खोदकाम करतांना शोधता येते. त्या समितीने डिसेंबर 2020 मध्ये याचा अहवाल सादर करतांना सांगितले आहे की, इंग्रजी अक्षरातील एल या आकाराप्रमाणे तेथे तीन मजली इमारत जमीनी खाली आहे. सोबतच भगवान सोमनाथ मंदिर परिसरातील त्या जमीनीच्याखाली बौध्द विहार असल्याचे अवशेष सापडले आहेत. पण हा संपुर्ण अहवाल दाबून टाकण्यात आला आहे. आपण असे का केले नरेंद्र मोदीजी. पुरातात्वीक सर्व्हेक्षणाचे आदेश आपण दिले पण आलेल्या अहवालावर कोणतीही कार्यवाही केली नाही. का दाबून ठेवला तो अहवाल याचे उत्तर देश मागत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंानी विदेशातून काही चित्ते आणले. त्या चित्त्यांच्या बातम्या लिहिण्यासाठी तुमचा मिडीया चित्यांच्या रंगाचे कपडे घालून रिपोर्टींक करत होते. आज त्या चित्यांची अवस्था अशी झाली आहे की, त्यांनी आम्हाला कॅमेरे का दिसत नाहीत या चिंतेत आहेत. नरेंद्र मोदीजींनी सुध्दा त्या चित्यांचे स्वत: फोटो काढले आहेत. पण आज त्या चित्यांची अवस्था काय आहे कोणाला माहित नाही. किंवा ते सांगितले पण जात नाही. अर्थात चित्यांना आणले आणि त्यांची देखरेख हा एक चॅप्टर त्यावेळेस तयार करण्यात आला होता. पण आज तो चॅप्टर बंद झाला आहे. कारण तुम्हाला आपण दिलेल्या आदेशानंतर आलेल्या अहवालावर कार्यवाही करता आली नाही. त्यानंतर तुम्ही पंतप्रधान झालात तरी सोमनाथ मंदिराखाली बौध्द स्तुप असलेल्या अहवालावर काही कार्यवाही झालेली नाही. तेंव्हा तुमच्या आदेशाने झालेल्या सर्व्हेक्षणाचे अहवाल आज गुगलवर सुध्दा उपलब्ध आहेत.
पण सध्या संबल, ज्ञानवापी यावरच चर्चा सुरू आहे. सम्बल येथे खा.राहुल गांधी यांना रोखले जात आहे. का रोखले जात आहे, त्यांना सम्बलला जाण्याचा अधिकार भारतीय संविधानात नाही काय? पण तुम्ही सुरू केलेले हे सम्बल चॅप्टर तुम्हाला चालवायचे आहे. तुम्हाला ज्ञानवापीचे चॅप्टर चालवायचे आहे पण सोमनाथ मंदिराचा चॅप्टरची संचिका तुम्ही बंद का केली आहे. भारतातील नागरीक पुजा करत असतील, करत नसतील, आस्तीक असतील, नास्तीक असतील पण आपल्या धर्माच्या बाबतीत त्यांना आस्था आहे आणि या आस्थांचा सुध्दा तुम्ही असा प्रयत्न करत आहात की, ज्या गावांमध्ये पसरलेल्या प्रेमाचे दर्शन करण्यासाठी जगातून लोक येतात त्या गावांना तुम्ही द्वेषांची प्रयोगशाळा म्हणून वापर करत आहात. देशाच्या भल्यासाठी तुम्हीच केलेल्या सर्व्हेक्षणाला पुन्हा एकदा जाहीर करा आणि त्यावर योग्य कार्यवाही करा यासाठीच आम्ही ही मेहनत घेतली आहे.
-रामप्रसाद खंडेलवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!