नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट पुलावर दोन तोतय्या पोलीसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला ठकवून त्यांच्याकडील 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेदरम्यान रामप्रसाद छगनलाल शर्मा रा.नरसिंहमंदिर जवळ कौठा हे 66 वर्षीय व्यक्ती गोवर्धनघाट पुलावरून पायी जात असतांना त्यांना दोन जणांनी अडवले आणि गोवर्धनघाट ब्रिजवर खुप चोऱ्या होत आहेत म्हणून तुमच्याकडे असेलेले दागिणे आम्ही बांधून तुम्हाला सुरक्षीत देतो कारण आम्ही पोलीस आहोत असे भासवले. त्या दोन तोतय्या पोलीसांनी हात चालाखी करत रामप्रसाद शर्मा यांचे दागिणे पुडीत ठेवल्याचा देखावा करत दगड ठेवले आणि त्यांची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन 80 हजार रुपये किंमतीची अंगठी असा 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे.
वजिराबाद प ोलीसांनी या घटनेला गुन्हा क्रमांक 590/2024 प्रमाणे पोलीस दप्तरी दाखल केले आहे. पोलीस अंमलदार गव्हाणकर अधिक तपास करीत आहेत.