नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर तालुक्यातील बोरगाव शिवारात एका व्यक्तीला रोखून दोन जणांनी 33 हजार 326 रूपये रोख आणि त्याचा टॅब लुटला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत खांबावरचे 5.6 कि.मी. लांब ऍल्युमिनीयम धातूचे तार 2 लाख 52 हजार रूपये किमतीचे चोरले आहे. मन्याड नदीच्या शेजारी बहाद्दरपूरा येथील मोटारीचे केबल, 15 हजार रूपये किंमतीचे दोन जणांनी चोरले आहे.
नितीन गणपत देवके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते सांगवी ते बोरगाव रस्त्यावरील वळणाच्या चढतीवर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांना रोखून त्यांच्या जवळचे 33 हजार 326 रूपये रोख आणि त्यांचा टॅब बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेेले आहेत. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्र. 550/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
वीज वितरण कंपनीचे अभियंता नारायण गोपळराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 डिसेंबर रोजी रात्री 11.30 ते 3 डिसेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान कामठा पाटी ते सावरगाव या रस्त्यावरील विद्युत खांबांवरी रोवलेले 5.6 कि.मी. लांबीचे ऍल्युमिनीयम धातूचे तार याची किंंंमत 2 लाख 52 रूपये आहे, केाणीतरी चोरून नेले आहेत. अर्धापूर पोलिसांनी हा प्रकार गुन्हा 203/2024 नुसार पोलीस दप्तरी दाखल केल आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार गोणारकर करीत आहेत.
ग्रामपंचायत कार्यालय बहाद्दरपूरा येथे पाणीपुरवठा विहिरीवर लावलेले 15 हजार रूपये किंमतीचे केबल 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता प्रकार मारोती जोंधळे वय 24, रा. भोसी रोड कंधार आणि सुशांत उर्फ मुन्ना मरीबा आढाव रा. पानभोसी रोड कंधार हे चोरून नेत असताना जनतेने प्रकाश मारोती जोंधळेला पकडले. दुसरा मात्र फरार झाला. कंधार पोलिसांनी ही घटना 410/2024 नुसार नोंदविली आहे. पोलीस अंमलदार व्यवहारे अधिक तपास करीत आहेत.