नवीन नांदेड ( प्रतिनिधि )-सिडको एमआयडीसीत तिरुमला आँईल मिला लागलेल्या आगीत पाच जणांचा समावेश आहे . त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर तिन आग्नीशामक दलाच्या गाड्यानी आगीवर नियञन मिळवले आहे . हि आग कशामुळे लागली हे अध्याप स्पष्ट झाले नाही . घटनास्थळी नांदेड दक्षिण विधानसभेचे आ आनंदराव बोंढारकर , नांदेड तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पहानी केली .
नांदेड – उस्मानगर रस्त्या लगत असलेल्या सिडको औद्योगिक वसाहतीतील तिरुमला आँईल मिललां अचानक आग लागल्याची घटना दि १ डिसेबर रोजी १२ वाजण्याच्या सुमारास घडली . या घटनेत कंपनीचे मालक भास्कर कोतावार , सुमत बंडेवार,हर्षद कोतावार,सुधाकर बंडेवार, विनोद कोत्तावार हे जखमी झाले . त्यांना तात्काळ नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . यात दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती खाजगी रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली .
हि आग इतकी भिषण होती . घटनेची माहीती मिळताच अग्णीशामक दलाच्या पथकांनी तिन गाड्यांच्या सहाय्यानी हि आग अटोकँत आणती.या आगीत तिरुमला कंपनीच्या तृप्ती आईल या नावाने चालणाऱ्या आईलचे मोठे नुकसान झाले . हि आग कशामुळे लागली हे अध्याप स्पष्ट झाले नसले तरी दि १ डिसेबर रोजी रविवार असल्याने या कंपनीला सुट्टी होती . त्यामुळे या कंपनीत कामगार कामावर आले नव्हते . त्यामुळे मोठ्याप्रमाणात जिवितहाणी टळली असल्याची चर्चा या ठिकाणी होती . या आगीत टेप्पा क्र एम.एच. २६ सी. एच. ०७०० हा जळून खाक झाला आहे . या आगीत किती नुकसान झाले ते अध्याप हि स्पष्ट झाले नसले तरी मोठ्याप्रमाणात आईल या आगीत जळाले असल्याचे दिसुन येते . या घटनेची माहीती सिडको – हडको परिसरात कळताच अनेक नागरिकांनी याकडे धाव घेतली होती . त्यामुळे उस्मानगर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती .