नांदेड(प्रतिनिधी)-बार्शी शहरातून बेपत्ता झालेल्या एका 24 वर्षीय युवकाच्या शोधासाठी बार्शी पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. हा युवक नांदेडमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सलमान रईज बागवान यांनी दिलेल्या खबरीनुसार दि.6 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचा भाऊ अरबाज रईस बागवान (24) रा.नाळेप्लॉट बार्शी ता.बार्शी जि.सोलापूर हा कोणासही न सांगता घरातून निघून गेला आहे. यासंदर्भाने बार्शी पोलीसांनी मिसिंग क्रमांक 123/2024 दाखल केला असून त्याचा तपास बार्शी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बार्शी पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार गायब झालेला युवक आरबाज रईस बागवान याचे वय 24 वर्ष आहे. त्याचा रंग सावळा आहे. त्याची उंची 157 सेंटीमिटर आहे. त्याने घरातून जातांना चॉकलेटी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याचा चेहरा उभट आहे. त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. त्याचे शिक्षण 10 वी पर्यंत झालेले आहे. त्याच्या डाव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजी भाषेत सोनु असे गोंदलेले आहे. त्याच्या डोक्याच्या मध्यभागी टकल पडलेले आहे. तो नेहमी आपल्या चेहऱ्यावर थोडीसी दाडी ठेवतो. त्याचे नाव सरळ आहे. त्याचा बांधा सडपातळ आहे.
बार्शीचे पोलीस निरिक्षक बालाजी कुबडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, हा गायब झालेला व्यक्ती 6 नोव्हेंबर रोजी पनवेल नांदेड गाडीत बसला होता. तो व्यक्ती नांदेडमध्ये असण्याची शक्यता आहे तरी जनतेने छायाचित्रात दिसणारा आणि आम्ही लिहिलेल्या वर्णनाप्रमाणचा माणुस कोणास दिसल्यास त्यांनी या संदर्भाने बार्शी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. बार्शी येथील पोलीस अंमलदार वाघमोडे यांना त्यांचा मोबाईल क्रमांक 9594945025 वर माहिती देता येईल. तसेच त्यांच्या नातलगांनी सुध्दा वास्तव न्युज लाईव्हकडे पाठविलेले मोबाईल क्रमांक 9604920007 आणि 9545043786 यावर सुध्दरा माहिती देता येईल.