नांदेड(प्रतिनिधी)-पोलीसांच्या खाजगी वाहनामध्ये पोलीस असे लिहिलेली पाटी लावता येते काय? असा प्रश्न एका गाडीमध्ये ही पाटी पाहिल्यानंतर समोर आला आहे.
नांदेड शहरातून दोन दिवसापुर्वी रात्रीच्यावेळी बाहेर जाणाऱ्या एका नागरीकाने एम.एच.26 सी.पी. 1411 या लाल रंगाच्या एकदम महागड्या गाडीचा फोटो काढला. या गाडीच्या ड्रायव्हींग सिटसमोर असणाऱ्या डॅशबोर्डवर इंग्रजीमध्ये पोलीस लिहिलेली एक पांढरी पाटी ठेवलेली दिसते आहे. ही गाडी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणच्या पोलीस चौकीसमोर उभी आहे असे या छायाचित्रात दिसते. पण ही पोलीस चौकी कोणती आहे हे पोलीस चौकीच्या बोर्डवर स्पष्टपणे दिसत नाही.
हे महागडे चार चाकी वाहन पोलीस अंमलदाराचे आहे की, पोलीस अधिकाऱ्याचे आहे हेही यावरून काही स्पष्ट होते नाही. परंतू पोलीस अशी पाटी लावली आहे म्हणजे हे वाहन खरेच पोलीसांचे आहे की, कोणी भामट्याने पोलीस अशी पाटी लावून तो ही महागडी गाडी वापरत आहे जेणे करून इतरांवर त्याचा प्रभाव तयार होईल हे देवच जाणे. पण खऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना सुध्दा अशा प्रकारची पोलीस लिहिलेली पाटी आपल्या गाडीत लावता येते काय? हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.