लोकसभा पोटनिवडणुकीत कॉंगे्रस विजयी
नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला पुर्णपणे धुऊन टाकले आहे. भारतीय जनता पार्टी-133, शिवसेना एकनाथ शिंदे गट-56, राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार-41, शिवसेना उध्दव गट-20, भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रस-16, राष्ट्रवादी शरद पवार गट-10, समाजवादी पार्टी-2 इतर आणि अपक्ष-10 असा निकाल लागला आहे. नांदेड जिल्ह्यात सुध्दा महायुतीने सर्व 9 विधानसभा जागा जिंकल्या आहेत. लोकसभेत कॉंगे्रस पक्षाने विजय मिळवला आहे. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेली महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आज मतमोजणीनंतर समाप्त झाली. राज्यात भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांनी 133 जागा मिळवल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे 56 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी माझा एकही माणुस पडणार नाही हे दिलेले शब्द खरे ठरले. अजित पवार यांनी सुध्दा आपल्या पक्षासाठी 41 जागा मिळवल्या आहेत. अशा प्रकारे महायुतीने महाविकास आघाडीला धुवून टाकले आहे.नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंगे्रस पक्षाचे प्रा.राजेंद्र वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या संतुक हंबर्डे यांना पराभूत केले आहे. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात भोकर येथील श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी सर्वाधिक 49 हजार मताधिक्यमिळवले आहे. नांदेड दक्षीण-आनंद तिडके बोंढारकर, नांदेड उत्तर-बालाजी कल्याणकर, नायगाव-राजेश पवार, देगलूर-जितेश अंतापूरकर, मुखेड-डॉ.तुषार राठोड, किनवट-भिमराव केराम, हदगाव-बाबूराव कदम कोहळीकर आणि लोहा-प्रताप पाटील चिखलीकर यांनी विजय मिळवला आहे.
ही माहिती वृत्त लिहीपर्यंतची आहे. मतमोजणी अजूनही सुरूच आहे. अंतिम निकाल आलेला नाही.