पंतप्रधान देशाबाहेर, गृहमंत्री दिल्लीला परत काय असेल हा गेम ?

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान आता 60 तासाच्या आसपास शिल्लक असतांना भारताचे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर गेले आहेत. तसेच भारताचे गृहमंत्री हे आपल्या अनेक सभा सोडून दिल्लीला परत गेले आहेत. काय असेल हा गेम? यावर अनेक जणांनी आपले विश्लेषण प्रसारीत केले आहे. त्यांचे विश्लेषण काय असेल यापेक्षा महाराष्ट्राची निवडणुक महत्वाची नाही काय? हा मुद्दा मात्र महत्वाचा आहे. तसेच काही सेटींग झाली आहे काय? ज्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना या निवडणुकीची चिंता नाही. असे म्हणावे काय!
महाराष्ट्राची विधानसभा निवडणुक आता संपण्याच्या मार्गावर आहे. मतदान सुरू व्हायला 60 तास शिल्लक असतांना त्याअगोदर म्हणजे 90 तास शिल्लक असतांना भारताचे पंतप्रधान नायजेरीयाच्या दौऱ्यावर गेले आहेत. मुळात त्यांची ब्रिक्सची बैठक ब्राझिलमध्ये आहे आणि ती 20 नोव्हेंेबर रोजी आहे. मग ते तीन दिवस अगोदरच का गेले असतील. असा प्रश्न आपण स्वत:ला विचारला आणि त्याचे उत्तर शोधले तर असे दिसते की, बहुदा त्यांचा चेहरा, त्यांचे बोलणे, त्यांचे शब्द महाराष्ट्रात काहीच फरक पाडत नाहीत. याची जाणीव भारतीय जनता पक्षाला झाली असेल म्हणूनच किंवा आपण स्वत: हून पंतप्रधानांनी हे समजून घेतले असेल म्हणून ते विदेशात निघून गेले असतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसऱ्या घटनेत भारताचे गृहमंत्री सुध्दा विदर्भातील आपल्या तीन जाहीर सभा रद्द करून दिल्लीला परत गेले आहेत. मग महाराष्ट्र कोणाच्या हातात देवून गेले हा प्रश्न आहे. कारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांमध्ये सध्या बोलणे सुध्दा बंद आहे. प्रत्येकाने आपले उमेदवार जास्त निवडुण यावेत म्हणून अनेक जागी बंडखोर उमेदवारांना पाठींबा दिला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, कॉंगे्रस आणि अपक्ष अशा सहा वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये लढत सुरू झाली आहे. या लढतीमध्ये मतदार काय करेल हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आणि मतदार आपल्या विरुध्द जाईल या भितीने गृहमंत्री दिल्लीत बसून मशीनचा खेळ करतील काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धु्रव राठी या युट्युबर युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या धोरणाचा अवलंब करून प्रत्येक नेत्याला आव्हान दिले आहे की, अडीच कोटी युट्युबर्स आहेत आम्ही सर्व जण तुम्हाला मदत करू पण आम्हाला जनतेच्या भल्याची शाश्वती कोण देईल त्यालाच आम्ही मदत करू. अडीच कोटी युट्युबर्स ही खुप मोठी ताकत आहे आणि त्या ताकतीला जनतेच्या भल्यासाठी वापरायला आम्ही सुध्दा तयार आहोत. धुव्र राठी सांगातात त्या योजना, त्याच्यातील विज्ञान आणि त्याला अंमलात आणायची पध्दती आमच्या मते तरी नेत्यांना कळेल यापेक्षा खुप पुढची आहे. अशा परिस्थितीत आणि निवडणुकीला शिल्लक राहिलेला काळ लक्षात घेता धुव्र राठीच्या स्वराज्य योजनेवर नेते मंडळी काम करतील याला न लिहिलेलेच बरे.
विधानसभा निवडणुकीतील मतदारांना वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने नक्की आवाहन आहे की, धुव्र राठी ला युट्युबवर शोधा, त्याने तयार केलेला स्वराज्य योजनेचा व्हिडीओ पाहा. तो कमीत कमी चारदा ऐका त्यानंतर मात्र नक्कीच मतदारांना याचा भास होईल की, धुव्र राठी सांगतात त्याप्रमाणे आपण कोणाला मतदान केले पाहिजे. जेणे करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काही चांगली मंडळी निवडूण येईल. राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मोठ्या नेत्यांनी तिकिट वाटपात सुध्दा मोठा घोळ केलेला आहे. तरी पण जनतेने हा घोळ आजच्या निवडणुकीपुरता विसरावा आणि आपले मतदान हे समृध्द लोकशाहीसाठी समर्पित करतांना पुढचे पाच वर्ष आपल्याला रडायची वेळ येणार नाही यासाठी विचारपुर्वक मतदान करावे म्हणूनच एवढी मेहनत आम्ही घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!