16 नोव्हेंबर रोजी आनंदराज आंबेडकर यांची नांदेडमध्ये प्रचार सभा
नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराव आंबेडकर यांची जाहीर सभा 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच नांदेड निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वत: दखल घेवून एमआयएम पक्षाचे नांदेड दक्षीणमधील उमेदवार सय्यद मोईनविरुध्द यांच्या प्रतिनिधीविरुध्द गुन्हा दाखल केला. त्याच धरतीवर नांदेड उत्तरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा निवडणुक प्रचार करणाऱ्या भंते पय्याबोधीवर सुध्दा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा.राजू मधूकरराव सोनसळे यांनी अशी मागणी केली आहे.
रिपब्लिकन सेनेचे नांदेड पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा.राजू सोनसळे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनविकास परिषदेचे ऍड.शिवाराज कोळीकर, बहुजन लोक न्याय संघाचे राहुल चिखलीकर, रिपब्लिकन सेनेचे नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार प्रतिक मोरे अनिल सिरसे आदींची उपस्थिती होती.
दि.16 नोव्हेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराव आंबेडकर हे नांदेडला प्रचारासाठी येत आहेत. त्यांची जाहीर सभा इंदिरा गांधी मैदाना येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. जनतेने या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.राजू सोनसळे यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले की, धर्माचे काम करणाऱ्या भंते पय्याबोधी यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा स्वत:च्या हातात घेतला, सोबत श्रामणेरांच्या हातात दिला आणि स्वत: वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत आंबेडकरी समाजासमोर वावरत आहेत. भंते पय्याबोधी यांनी एका लहान बालिकेच्या हातात जी बालिका आपल्या डोक्यावर सामान घेवून विक्री करत होती. तिला सुध्दा वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा कागद दिला. याशिवाय अनेक बालकांना सोबत घेवून भंते पय्याबोधी हे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत आहेत याबद्दल निषेध व्यक्त केला. प्रा.राजू सोनसळे यांनी काही छायाचित्रे सुध्दा दिले. ज्यामध्ये भंते पय्याबोधी असा प्रचार करत आहेत. प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले की, फक्त आंबेडकरी समाजाच्या वस्त्यांशिवाय भंते पय्याबोधी इतर कोठेच वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करत नाहीत. नांदेडमध्ये एमआयएम पक्षाच्यावतीने नांदेड दक्षीण विधानसभेचे उमेदवार सय्यद मोईन यांनी अल्पवयीन बालकांना सोबत घेवून ती रॅली काढली होती. या संदर्भाने नांदेड निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी लहान बालकांचा उपयोग रॅलीत केला म्हणून एमआयएमचे प्रतिनिधी शेख करीम शेख अहेमद यांच्याविरुध्द एफएसटी-2 पथकाचे प्रमुख मनपाचे सहाय्यक अभियंता खुशाल कदम यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशाच पध्दतीची दखल भंते पय्याबोधीजी यांच्या संदर्भाने सुध्दा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा प्रा. राजू सोनसळे यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेतच राष्ट्रीय जनविकास परिषदेचे ऍड.शिवराम कोळीकर आणि बहुजन लोक न्याय संघाचे राहुल चिखलीकर यांनी लोकसभा पोटनिवडणुकीत आपल्या संघटनांचा पाठींबा प्रा.राजू सोनसळे यांना जाहीर केला. निवडणुकांमध्ये घराणेशाही तयार होत असल्याने सामाजिक लोकशाही संपत चालली आहे. मी खासदार झालो तर अशी सामाजिक लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो. सोबतच खासदार झाल्यानंतर त्रिशताब्दी सोहळ्यात मिळालेल्या निधीचा उपयोग आणि आदर्श घोटाळा यांची चौकशी जेपीसीने करावी अशी मागणी करेल. मी विद्यापीठामध्ये उर्दु, संस्कृत आणि पाली भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सोय करणार आहे. मी संघर्षातून आलेला कार्यकर्ता असून जनतेने माझ्या पदरात मते टाकावी असे आवाहन करतो आहे असे प्रा.राजू सोनसळे म्हणाले.