नांदेड -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व स्किल ट्री लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील 65 हजार शाळेंसाठी सुरक्षा आणि सुरक्षितता हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅडम यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये राबविण्यात येत असून या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मास्टर ट्रेनर अशाप्रकारे 36 जिल्ह्यासाठी 36 मास्टर ट्रेनर यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मुंबई येथे दिनांक 29 10 2024 रोजी संपन्न झाले असून हे प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्व मास्टर ट्रेनर यांनी या सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचा जिल्हा परिषदेतील शाळेंना खूप फायदा होईल अशी अपेक्षा केली आहे व हा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद संचालक आर विमला मॅम यांचे आभार व्यक्त केलेले आहे.