शक्तीप्रदर्शन करत अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा वेग जोरदारपणे वाहत आहेत. आज कॉंगे्रस, शिवसेना (एकनाथ शिंदे), वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक अपक्षांनी आप-आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन सुध्दा केले.
विधानसभा निवडणुक 2024 च्या अर्ज भरण्याच्या उद्याचा दिवस शेवटचा आहे. आज कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी प्रा.राजेंद्र चव्हाण, नांदेड दक्षीणसाठी माजी आ.मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तरसाठी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी जुना मोंढा येथून मिरवणूक काढत आपले शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला. वंचित बहुजन आघाडीचे इंजि.प्रशांत इंगोले यांनी सुध्दा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वाजत गाजत जाऊन अर्ज भरला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार बालाजी कल्याणकर यांनी सुध्दा बहुसंख्येने आपले समर्थक सोबत आणून अर्ज भरला. यांच्यासोबत काही अपक्षांनी सुध्दा आपले अर्ज सादर केले. त्यात तृतीय पंथी डॉ.सान्वी जेठवाणी यांचा पण समावेश आहे.
अर्ज भरण्याच्या अनेकांच्या घाईमुळे आज नांदेड शहरात वाहतुकीची वाट लागली. पण वाहतुक पोलीसांनी धावपळ करत वाहतुक सुरळीत केली. त्यात काही नागरीकांनी सुध्दा पोलीसांना मदत केली. दिवाळी आणि निवडणुक यामुळे सुध्दा बाजारात गर्दी आहे आणि त्याचाच परिणाम वाहतुक खोळंबण्यावर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!