नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीने 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात उमेदवार बदलून प्रशांत इंगोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अगोदर 86-नांदेड उत्तर या विधानसभा जागेसाठी वंचित बहुजन आघाडीने प्रा.गौतम दुथडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतू पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेवून वंचित बहुजन आघाडीने प्रा.गौतम दुथडे यांच्या जागी आता प्रशांत इंगोले यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली आहे. हे पत्र वंचित बहुजन आघाडी निवडणुक समन्वये समिती यांच्यावतीने जारी करण्यात आले आहे. या पत्रावर अध्यक्ष रेखा ठाकूर, सह अध्यक्ष अशोक सोनवणे, प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रशांत इंगोले हे पुर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष होते. कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांनी अनेक आंदोलने करून आपल्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांची फौज दाखवलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कामांसाठी त्यांनी नेहमीच प्राथमिकता दिली. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांमध्ये सुध्दा मोठा बदल होईल अशी शक्यता आहे.