नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून तिन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्यांची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे. त्यातील एक गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबर 2024 रोजी विष्णुपूरी दवाखान्यातून अविनाश अशोक येडे रा.वैजाळा ता.पाटोदा जि.बीड यांची दुचाकी चोरीला गेली. त्या संदर्भाचा गुन्हा क्रमांक 872/2024 नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होता. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याची माहिती काढून सुजल सर्जेराव देशमुख (19) रा.मिरखेल जि.परभणी, मुकूंद गंगाधर करे(27) रा.पांढरगाव ह.मु.खंडोबा बाजार परभणी, कृष्णा मारोती कुरधणे(25) रा.तरोडा जि.परभणी या तिघांना पकडले या तिघांकडून वेगवेगळ्या कंपनीच्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या. या तिन्ही दुचाकी गाड्या चोरीच्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखूल झालेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गवळी यांच्याकडे आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, विक्रम वाकडे, शंकर नलबे, माधव माने, शंकर माळगे, ज्ञानेश्र्वर कलंदर, शेख असीफ, शिवानंद तेजबंद यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.