नांदेड जिल्ह्यात पहिल्या दिवशी विधानसभेसाठी एकही अर्ज नाही

 *लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज* 
 *९ विधानसभेसाठी एकूण ४११अर्जाची तर लोकसभा मतदार संघात ४५ अर्जाची उचल* 
नांदेड :- जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मंगळवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. २०० हून अधिक इच्छूकांनी ४११ उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी एका अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला आहे.
     नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
   नांदेड उत्तर मतदारसघात ३७ उमेदवारांनी ५४ अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात ६१ इच्छूकांनी ६९ अर्जाची उचल केली आहे. लोहा मतदारसंघात २१ इच्छूकांनी ५३ अर्ज, किनवट मतदार संघात १८ इच्छूकांनी ४१ अर्ज, हदगाव मतदारसंघात २५ इच्छूकांनी ३६ अर्ज, नांदेड दक्षिण मतदार संघात ४० इच्छूकांनी ६९ अर्ज, देगलूर मतदारसंघात २२ इच्छूकांनी ४४ अर्ज, मुखेड विधानसभा मतदारसंघात ५ इच्छूकांनी ९ अर्ज आणि नायगाव मतदारसंघात २२ इच्छूकांनी ३६ अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी एकाही इच्छूकांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली नाही.
 *लोकसभेसाठी एक अर्ज दाखल* 
    लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. आज पंचवीस व्यक्तींनी जवळपास 45 अर्जाची उचल केली आहे. आज पहिल्याच दिवशी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणारे अपक्ष उमेदवार जफर अली खान आहेत.
*असा आहे कार्यक्रम :*
अधिसूचना जाहीर             : 22 ऑक्टोबर
नामांकनाची अंतीम तारीख : 29 ऑक्टोबर
नामांकनाची छाणणी          : 30 ऑक्टोबर
नामांकन मागे अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान तारीख.                   : 20 नोव्हेंबर
मतमोजणी तारीख.              : 23 नोव्हेंबर 2024.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!