नांदेड(प्रतिनिधी)-लोहा आणि माळेगाव या दोन ठिकाणी चोरट्यांनी दोन दुकाने फोडून त्यातून 2 लाख 51 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा येथील प्रकाश सुर्यकांत पातेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.20 ऑक्टोबरच्या रात्री 10 वाजता त्यांनी आपले पालम रस्त्यावरील बालाजी टायर्स हे दुकान बंद केले आणि घरी गेले. सकाळी 4 वाजता त्यांना माहित झाले की, त्यांच्या दुकानाचे शटर तोडलेले आहे. येवून तपासणी केली असता दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले रोख रक्कम 1 लाख 40 हजार रुपये आणि दोन टायर 3 हजार 300 रुपयांचे असा एकूण 1 लाख 43 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरला आहे. लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 556/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत माळेगाव येथील राजकुमार बालाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑक्टोबरच्या रात्री 9 ते 21 ऑक्टोबरच्या पहाटे 4 वाजेदरम्यान बस स्टॉप लातूरच्या शेजारी असलेले त्यांचे टिनपत्राचे दुकान तोडून चोरट्यांनी त्यातून रोख रक्कम 1 लाख 48 हजार रुपये चोरून नेली आहे. माळाकोळी पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 237/2024 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक हाके हे करीत आहेत.