प्रा. राजू सोनसळे लढवणार नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक 

 

नांदेड -होऊ घातलेल्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रिपब्लिकन सेनेने आपला उमेदवार जाहीर केला असून जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज प्रा. राजू सोनसळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली . पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश सचिव माधव दादा जमदाडे, मास मुमेंटचे अध्यक्ष प्रतीक मोरे, जिल्हा महासचिव शंकर थोरात, राष्ट्रीय जनविकास पार्टीचे ऍडव्होकेट शिवराज कोळीकर , बहुजन लोकन्याय संघाचे राहुल चिखलीकर, इलियाज पाशा राजुरकर आदींची उपस्थिती होती.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक ही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. नांदेड लोकसभेचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मृत्यू पश्चात रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यात सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेने ही आता निवडणुकीच्या मैदानात ओळी उडी घेतली आहे . आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व प्रा. राजू सोनसळे यांना रिपब्लिकन सेनेची उमेदवारी देण्यात येणार असून लोकसभेची पोटनिवडणूक आम्ही ताकतीनशी लढू असा विश्वास प्रा.सोनसळे यांनी आयोजित पत्रकार व्यक्त केला .नांदेड लोकसभेतील विकासाचे अनुषंगाने अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. या आधीच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला नांदेड लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधता आला नाही . केवळ सत्ता मिळवणे आणि त्यातून पैसा कमावणे यापलीकडे नांदेड लोकसभेच्या खासदारांनी जन विकासाच्या कामाला प्राधान्य दिले नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. निवडणूकच्या काळात फुले – शाहू- आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि त्यानंतर या घटकाला जाणीवपूर्वक वंचित ठेवायचा असा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत साधण्याची टीकाही त्यांनी केली. नांदेड लोकसभेला नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीला सामोरे जाताना महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्जाच्या मर्यादित वाढ करणे. बौद्ध समाजासाठी स्वतंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच एमआयडीसीचे पुनर्वसन करून येथे नूतन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातील कर्जाची मर्यादा वाढवून अटी शितल करण्यासाठी प्रयत्न करणे. बहुजन समाजातील मुलांसाठी नांदेड लोकसभेतील प्रत्येक विधानसभेच्या तालुका पातळीवर स्वतंत्र मोफत अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करणे . शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी मोफत विमा केंद्राची निर्मिती करणे . नांदेड लोकसभा मतदारसंघातील नांदेड शहरासह ग्रामीण भागातील जी कुटुंब शासकीय जागेवर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास आहेत त्यांना त्या जागेची मालकी हक्क मिळवून देणे .घरकुल मिळवून देणे .महिला व तरुणींसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण केंद्र मोफत सुरू करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे . नांदेड लोकसभेतील प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्याने जोडणे आणि गाव तिथे बस ही संकल्पना अमलात आणणे .जय भीम नगर परिसरातील बुद्धभूमीवर तथागतांचे स्मारक उभारणे. नांदेड शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे .

पे अँड पार्किंगची व्यवस्था करणे . मराठा समाजातील मुला- मुलींसाठी प्रत्येक तालुक्यावर स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करणे तिथे अभ्यासिका सुरू करणे. प्रत्येक गावात शासकीय दूध संकलन केंद्र सुरू करणे. आदी आपली संकल्प असल्याचेही ते यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!