इम्तीयाज जलील नांदेडमधून निवडणुक लढविणार? सोशल मिडीयावर चर्चा
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभेसह नांदेड लोकसभेची पोट निवडणुक सुध्दा निवडणुक आयोगाने जाहीर केली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवंगत नेते खासदार वसंत चव्हाण यांचे सुपूत्र प्रा.रविंद्र वसंत चव्हाण यांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. कॉंगे्रस कमिटीचे सचिव के.सी.गोपाल यांच्या स्वाक्षरीने प्रा.राजेंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीचे पत्र जारी झाले आहे. कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष मल्लीकार्जुन खडगे यांच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला असे त्या पत्रात नमुद आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत 16 नांदेड लोकसभा मतदार संघातून नायगावचे माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण हे निवडुण आले होते. दुर्देवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर मात्र लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसचा उमेदवार कोण याचे तर्क वितर्क लढविण्यात आले. या चर्चांमध्ये माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या सुनबाई सौ.मिनल खतगावकर यांना उमेदवारी मिळेल असे विश्लेषण नांदेडच्या अनेक दिग्गजांनी केले. पण सर्वसाधारणपणे भारताच्या निवडणुकांमध्ये ज्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या वारसातील एका व्यक्तीला त्या निवडणुकीत उमेदवार बनविले जाते ही प्रथा आहे. या प्रथेनुसार तोच व्यक्ती निवडुण येतो असा आजपर्यंतचा ईतिहास आहे.
भारतीय संविधानाने जात संपवली असली तरी निवडणुकीच्या वेळेस जातींचा विचार केलाच जातो आणि त्याचनुसार जातीच्या समिकरणांची बेरीज लावून उमेदवारी जाहीर होते. या पध्दतीमध्ये काही चुकीचे नाही. कारण भारतीय जनता ही संवेदनशिल आहे. ज्या व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या कुटूंबियांबद्दल भारतीय जनतेमध्ये आस्थाच असते आणि ती असावी पण. त्यानुसार त्याच व्यक्तीला उमेदवारी मिळते आणि खुप कमी वेळेस असे झाले आहे की, ज्या व्यक्तीशिवाय दुसरा व्यक्ती निवडुण येतो.यामध्ये कॉंगे्रस सरस ठरली असून लोकसभा नांदेड पोट निवडणुकीसाठी कॉंगे्रस पक्षाने आपला उमेदवार सर्व प्रथम जाहीर केला आहे. या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये इतर उमेदवार कोण यावर पुन्हा अनेक तर्क वितर्क सुरू आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्ष कोणाला उमेदवार बनवतील याचा काही पत्ता अजून समोर आलेला नाही. त्यासाठी वाट पाहावी लागेल.
इम्तीयाज जलील नांदेडमधून?
आज दिवसभर सोशल मिडीयावरून असे प्रसारण होत आहे की, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले एमआयएमचे उमेदवार इम्तीयाज जलील हे नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार असतील अशा चर्चा होत आहेत. पण या चर्चांना आम्ही वृत्तलिहिपर्यंत कुठूनच दुजोरा आलेला नाही. यामुळे इम्तीयाज जलील नांदेडमधून निवडणुक लढवतील काय याचे उत्तर लोकसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.