नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील देगाव चाळ (भैयासाहेब आंबेडकर नगर) येथे दि.13 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्रिपिटक बुध्दविहार समितीच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. दि.13 ऑक्टोबर रोजी 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहरातील देगावचाळ भागातील त्रिपिटक बुध्दविहार येथे ध्वजारोहन व बुध्दवंदना घेवून कायक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले. यावेळी नवीन श्रामनेर झालेल्यांचा त्रिपिटक बुध्दविहार समितीचे अध्यक्ष बंटीभाऊ लांडगे यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व त्रिपिटक बुध्दविहार समितीचे पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241013-WA0026.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241013-WA0025.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,361 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माझ्याकडे चुकीला माफी नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर येथील वनपरीक्षेत्र कार्यालय नूतन इमारतीचे उदघाट्न