नांदेड(प्रतिनिधी)-अभ्यासासह क्रिडा माध्यमातून सुध्दा आपल्याला आपल्या स्वप्नांकडे धाव घेता येते असे प्रतिपादन राज्य शासनाने खेळांच्या माध्यमातून वर्ग-1 च्या पदावर नोकरी दिलेल्या आणि शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त लताताई उमरेकर यांनी केले. . लताताई उमरेकर यांचा किरण स्पोर्टस् असोसिएशनने सन्मान केला. त्या कार्यक्रमात लताताई उमरेकर या बोलत होत्या. बॅडमिंटन या क्रिडा प्रकारात जागतिक स्पर्धेत व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पद प्राप्त करणाऱ्या लताताई परमेश्र्वर उमरेकर यांचा किरण स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष पुजा लक्ष्मण फुलारी यांनी सन्मान केला. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात जिमनॅस्टिक आणि कराटे साहित्याची पुजा त्यांच्या हस्ते करून घेण्यात आली. Kanthak Suryatal Post Views: 743 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचा संवाद भुखंडांचे श्रीखंड दाखवून 70 लाखांची गंडवणूक