नांदेड – छत्रपती संभाजीनगर येथील बौध्द लेणी परिसराला बाधित करण्याचे अनुषंगाने आणि येथील विहाराचे बांधकाम अतिक्रमण ठरवून जाणीवपूर्वक उध्वस्त करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज नांदेडमध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात बौद्ध लेणी बचाव हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील घोषणांनी नांदेड शहर दणाणले. प्राध्यापक राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात असंख्य बौध्द अनुयायी मोर्चासाठी एकवटले होते. छत्रपती संभाजीनगर येथील बौद्ध लेणी या ऐतिहासिक आहेत. भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे त्या प्रतीक आहेत .अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक बौद्ध लेणीचे महत्व कमी करण्याच्या कुटील बुद्धिमत्तेतून या लेणींना बाधित करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील बौद्ध लेणी परिसरातील विहाराच्या बांधकामास अतिक्रमित ठरविणारी सुप्रीम कोर्टाची नोटीस ही जाणीवपूर्वक आणि धर्मांध शक्ती कडून देण्यात आलेली आहे . त्यामुळे सादर नोटीस रद्द करावी आणि बांधकाम नियमित करावे . या परिसरातील बौध्द लेणीच्या पायथ्याशी असणाऱ्या विहारासही तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्याचा सर्वांगीण विकास करावा या मागणीसाठी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता नांदेड शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध लेणी बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात बौद्ध प्रा. राजू सोनसळे यांच्यासह डॉ. राजेश्वर पालमकर, माधवदादा जमदाडे, प्रा. राजू सोनसळ, प्रा. इंजि साहेबराव गजभारे, राज आटकरे, प्रतिक भोरे, सय्यद इलयाज, आदी या मोर्चात बौद्ध अनुयायांनी मोठ्या सहभागी होते. छाया. Kanthak Suryatal Post Views: 924 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन विश्र्वासघात करणाऱ्या पाच पोलीसांना पोलीस उपमहानिरिक्षकांनी निलंबित केले