व्यसनामुळे कुटूंब, गाव आणि समाजाचे नुकसान होते-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-व्यसनाधीनतेमुळे कुटूंबावर, गावावर, समाजावर वाईट परिणाम होतात आणि त्यासाठी गावा-गावातील नागरीकांनी पुढाकार घेवून समाजातील युवकांना व्यसनापासून वाचवावे असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले.
मौजे इसाद जि.परभणी गावात व्यसनमुक्त गाव योजनेचे उद्‌घाटन करतांना शहाजी उमाप बोलत होते. गावा-गावांमध्ये श्रीमंतांची संख्या कमी असते आणि उर्वरीत मंडळी ही मोलमजुरी करून आपले कुटूंब चालवित असतात. आजच्या युगात जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमुळे छोटी बालके आणि युवक मंडळी व्यसनाकडे ओढली जातात आणि एकदा हा नाद लागला की, त्याचा परिणाम कुटूंबावर वाईट होतो, गावावर वाईट होतो आणि समाजावर सुध्दा वाईट होतो. व्यसनग्रस्त युवक गुन्हेगारीकडे वळतो आणि त्यातून पुन्हा कुटूंबाला समस्याच तयार होतात. व्यसनग्रस्त झालेला व्यक्ती मी काय करत आहे, त्याचा माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे याची जाण त्याला राहत नाही आणि पुर्ण कुटूंब उध्वस्त होते असे सांगितले.
याप्रसंगी परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी व्यसनाधिनतेमुळे वेगवेगळ्या प्रकारे कसा वाईट परिणाम होतो याबद्दलची अनेक उदाहरणे सांगतांना व्यसनाधिन व्यक्तीला जेवनाची सुध्दा सुध राहत नाही असे सांगितले.
2 ऑक्टोबरपासून शहाजी उमाप यांच्या पुढाकारातून व्यसनमुक्त गाव मोहिम सुरू करण्यात आली. 9 ऑक्टोबर रोजी अहमदपुर जि.लातूर येथील मौजे खंडाळी आणि परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या मौजे इसाद येथे व्यसनमुक्त गाव मोहिम सुरू करण्यात आली. खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमात लातूरचे अपर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांची उपस्थिती होती.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात असणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांमध्ये बहुतेक ग्राम पंचायतींनी ग्रामसभा घेवून तंटामुक्त गाव समित्यांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे गावोगावी ग्राम रक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या तयार करण्यात आल्या आहेत.गाव पातळीवर तयार झालेल्या समित्या दारु, गुटखा, जर्दा इत्यादी व्यसनाची साधने गावात न पोहचू नये म्हणून पोलीसांची मदत करत आहेत. गावकऱ्यांनी पोलीसांसोबत या व्यसनमुक्त गाव मोहिमेत आम्ही मेहनत करणार अशी ग्वाही दिली. मौजे इसाद येथे व्यसनाला कायमचा रामराम केलेल्या 5 नागरीकांचा सत्कार पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!