नांदेड(प्रतिनिधी)-भारत फायनान्शीयल एक्लुजन लि. शाखा कंधार येथे एका व्यक्तीने कंपनीची 2 लाख 29 हजार 502 रुपयांची फसवणूक फेबु्रवारी 2024 ते जून 2024 दरम्यान केली.
भारत फायनान्शीयल कंपनीचे कंधार येथील शाखाधिकारी गंगाराम लक्ष्मण पोचलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 फेबु्रवारी 2024 ते 8 जून 2024 दरम्यान दयानंद सोपान ढगे रा.रहाटी ता.जि.परभणी हा व्यवस्थापक पदावर असतांना महिला बचत गटांना दिलेल्या पैशांच्या वसुलीचे काम करत होता. बचत गटांचे पैसे दर आठ दिवसांना बॅंकेत जमा करणे अनिवार्य आहे. परंतू दयानंद ढगेने वसुल केलेले 2 लाख 29 हजार 502 रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून पैशांचा अपहार केला आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 409 नुसार गुन्हा क्रमांक 332/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार व्यवहार हे करणार आहेत.