१० ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा;  जिल्हा प्रशासनाकडून  तयारी सुरु

 नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांची उपस्थिती
 हजारो लाडकी बहिणींची उपस्थिती राहणार

नांदेड :- महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता १० ऑक्टोबरला होणार आहे.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान  नवा मोंढा मैदानावर भेट देऊन त्याच ठिकाणी बैठक घेतली.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तयारीला लागले आहे.
राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाचे हे आयोजन आहे.मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले असून या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांमधील लाभार्थ्यांची संवाद साधने व त्यांना प्रत्यक्ष या योजनाचा कार्यक्रमांमध्ये लाभ देणे सुरू आहे. ७ ऑक्टोबरला हा मेळावा होणार होता. मात्र तो पुढे गेला असून १० ऑक्टोंबरला होत आहे.
आज या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, महिला व बालकल्याण अधिकारी रूपाली रंगारी कदम यांच्यासह जिल्हा जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यामध्ये विविध विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आज नवा मोंढा मैदानावर आमदार कल्याणकर यांनीही भेट दिली. सर्व समिती प्रमुखांना त्यांच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढील आढावा बैठक ९ ऑक्टोंबरला होणार आहे.
नवा मोंढा येथील मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन ,महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!