नांदेड(प्रतिनिधी)-कत्तलीसाठी जाणाऱ्या 10 गाईंची सुटका हदगाव पोलीसांनी केली आहे. तसेच इतवारा पोलीसांनी 8 गोवंश जनावरे पकडली आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीसांनी 15 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि.5 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता हदगाव पोलीस गस्त करत असतांना उमरखेड टी पॉईंट येथे त्यांनी एम.एच.28 बी.बी.2221 या वाहनाची तपासणी केली असतांना त्यामध्ये 10 गायी दाटीवाटीने बांधून वाहतुक करण्यात येत होत्या. या गायी कत्तलीसाठी जात आहेत अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी 281/2024 हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस विभागाने गायी आणि चार चाकी वाहन असा 6 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मांटे, पोलीस अंमलदार जेठन पांचाळ, रावजी केंद्रे आदींनी केली आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, भोकरच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक शफकत आमना आदींनी हदगाव पोलीसांचे कौतुक केले आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यातील पोलीस पथक 5 ऑक्टोबर रोजी गस्त करत असतांना सकाळी 6 वाजेच्यासुमारास देगलूर नाका रस्त्यावर त्यांनी चार चाकी वाहन क्रमंाक एम.एच.22 ए.एन.0938 आणि एम.एच.26 बी.ई.4134 या दोन वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये गोवंश जातीचे 8 बैल दाटीवाटीने बांधून ठेवले होते आणि ते पोलीसांनी जप्त केले. पोलीसांनी जप्त केलेल्या गोवंशांची किंमत 3 लाख रुपये आणि चार चाकी गाड्यांची किंमत 6 लाख रुपये असा एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी इतवारा पोलीसांनी जबीउल्ला खान जहीरउल्ला खान, मोहम्मद इसाक मोहम्मद इब्राहिम, मिरासाब अब्दुल शेख, मोहम्मद एजाज मोहम्मद बाबुलाल सर्व रा.टायरबोर्ड देगलूर नाका यांच्याविरुध्द अनुक्रमे गुन्हा क्रमांक 365/2024 आणि गुन्हा क्रमांक 366/2024 दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, इतवारा पेालीस विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक विलास पवार, पोलीस अंमलदार शेख वाजिद, रेवननाथ कोळनुरे, होमगार्ड सय्यद इरफान यांचे कौतुक केले आहे.