जलजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न 

नांदेड- पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये राबविण्यासाठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी, मिनल करणवाल मॅडम यांचे मार्गदर्शन खाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम यांनी ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध व पुरेसा प्रमाणात पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्हामधील सर्व विस्तार अधिकारी आरोग्य व प्राथमिक आरोग्य केंद्र वरील सर्व आरोग्य सहाय्यक यांची मान्सून पश्चात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम यांनी पाणी गुणवत्ता व साथरोग या बाबतीत आरोग्य जिल्हा प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हिरानी मॅडम उपस्थित होते.

या कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम यांनी सर्व उपस्थित जिल्ह्यातील विस्तार अधिकारी आरोग्य व आरोग्य सहाय्यक यांना पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम व जलजन्य आजार ग्रामीण भागातील साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यामध्ये पाणी गुणवत्ता राखण्यासाठी आरोग्य विभागांची भुमिका

ग्रामीण भागातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सर्व स्तोत्र जसे विहीर, हातपंप, विद्युत पंप, नळयोजना पाणी पुरवठा पाण्याची टाकी यांचे बिल्चिग पावडर द्वारे शुध्दीकरण कसे करायचे व शुद्धीकरणाचे महत्त्व, TCL पावडर चे महत्व व साठवणूक,जलसुरक्षक यांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाणी गुणवत्ता चे प्रशिक्षण कसे घ्यावयाचे, मान्सून पश्चात ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची स्तोत्रचे स्वच्छता सर्व्हेक्षण १ आक्टोबर २०२४ ते ३० आक्टोबर २०२४ या कालावधीत गुणवत्ता पुर्ण कसे करायचे व मान्सून पश्चात रासायनिक व अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान प्रभावीपणे राबवून जिल्हा मध्ये कुठेही जलजन्य आजार साथरोग उदभवणार नाही यासाठी सविस्तर व प्रात्यक्षिक द्वारे सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच

पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातील विविध विभागांची जबाबदारी व भुमिका आहे, यांच्याशी समन्वय ठेवून काम करावे जिल्हा मध्ये मान्सून पश्चात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर जलसुरक्षक याची पाणी गुणवत्ता कार्यशाळा प्रात्यक्षिक द्वारे सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात यावे जिल्हा मध्ये कुठेही जलजन्य आजार साथरोग उदभवणार नाही असे आवाहन सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केले आहे.

या कार्यशाळेला बहुसंख्येने सर्व विस्तार अधिकारी आरोग्य व सर्व आरोग्य सहाय्यक उपस्थित होते ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ अन्सारी, नदीम, व स्वाती गंधे व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय मधील अधिकारी व कर्मचारी यांनी परीस्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!