नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने प्रतिक्षेत असलेल्या चार पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच इतर आठ पोलीस उपअधिक्षकांना सुध्दा सध्या नियुक्त्या बदलून नियुक्त्या दिल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बदलून आष्टी येथे जात आहेत.
राज्य शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या शासन आदेशानुसार 12 पोलीस उपअधिक्षकांना नियुक्त्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी नवीन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले शैलेश बाबुराव काळे यांना सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर अशी नियुक्ती दिली आहे. सविता मारोती गर्जे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन उपविभाग येथे पाठविले आहे. कुणाल शंकर सोनवणे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर येथे नियुक्ती दिली आहे. राजा शेरसिंग पवार यांना अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथे नियुक्ती दिली आहे.
इतर बदल्या झालेले आठ पोलीस उपअधिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. बाळकृष्ण जर्नाधन हनपुडे पाटील-उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली जि.नांदेड(आष्टी उपविभाग जि.बीड ), सुनिल जयसिंग तांबे-सहायक पोलीस आयुक्त पुणे शहर(पोलीस उपअधिक्षक सुधारसेवा पुणे), अनुराधा विठ्ठल उदमले-सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर(सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर), राजेश अर्जुनसिंह चंदेल-अपर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव), भागवत नामदेव पुंडे-उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर उपविभाग(उपविभागीय पोलीस अधिकारी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर), गजानन लक्ष्मण पडघन-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर(उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर उपविभाग), अनिल शिवाजी पवार-अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती(उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे उपविभाग).