कर्तव्यात कसूर, नेरली ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

नांदेड  : शेकडो लोकांना दूषित पाण्यामुळे अतिसाराला बळी पडावे लागले. ग्राम पंचायत अधिकारी पाणीपुरवठ्यासारख्या जोखमीच्या विषयावर हलगर्जीपणा केला असा ठपका ठेवून जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. नेरली दुर्घटनेत ग्रामपंचायत अधिकारी निलंबित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत नेरली येथे 27 नोव्हेंबर 2024 रोजी पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील दुषीत पाण्यामुळे गावात अतिसार साथ रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे अनेक लोकांना मळमळ,उलटी, जुलाब होवून अनेक रुग्णांना साथीचा आजार झाला.याबाबत अनेक रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले.आता परिस्थिती आटोक्यात असून आरोग्य विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे.

 

याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नेरली येथील ग्रामपंचायत अधिकारी आर.एस. हटकर यांना निलंबित केले आहे.

 

याबाबतचे आदेश 28 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केले आहे.

गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदेड यांनी सादर केलेल्या अहवालावरुन ग्रामपंचायत अधिकारी आर.एस.हटकर हे नेरली येथे कार्यरत असताना त्यांनी ग्रामपंचायत येथे पाणी पुरवठा निर्जतुकीकरण करण्यासाठी टीसीएल पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखे ग्रामपंचायतीमध्ये आढळून आलेले नाही. नळ योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ करणे, योग्य प्रमाणात टीसीएल पावडरचा वापर करणे आवश्यक असताना तसे केल्याचे दिसून आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!