नांदेड (प्रतिनिधि)-नांदेड जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या पुढाकारातून आज शेकडो तरुणांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, प्रतिक मोरे (मास मूव्हमेंट ), राहुल चिखलीकर (बहुजन लोकन्याय संघ) शंकर थोरात, रवी हाडसे, प्रेमीलाताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीला गती देण्यासाठी आणि आगामी राजकारणात सत्तेत सहभागी होण्याचे अनुषंगाने सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नांदेड उत्तर भागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्यापासून रिपब्लिकन सेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून असंख्य तरुण या पक्षाकडे येत आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्याच्या अनुषंगाने तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. उच्चशिक्षित तरुणांची आंबेडकरी चळवळीला आणि राजकारणाला नितांत गरज आहे. त्यामुळे तरुणांनी ध्येय उराशी बाळगून राजकारणात येऊन लोकशाहीला अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत जिल्हाध्यक्ष राजू सोनसळे यांनी या निमित्ताने व्यक्त केले.
सय्यद इलयाज पाशा, रुपेशभाऊ सोनसळे, महेश पंडित, आदर्श वाघमारे, सागर गायकवाड, पवन भदरगे, सतीश ढेंबरे, अमोल कांबळे, चिकू वेयदे, आदित्य नांदेडकर, सौरभ खंदारे, नीरज लोणे, गौरव जोंधळे, उमाकांत कार्ले, आकाश नरवाडे, संदीप मगरे, निखिल रायबोले, योगेश खंदारे, संकेत सोनकांबळे, रॉकी गायकवाड, विशाल नरवाडे, राज नरवाडे, सोनू गायकवाड, बंटी हटकर यांच्यासह अनेक तरुणांनी जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली आज रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला.