नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एक चोरीची दुचाकी गाडी आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पकडल्यामुळे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, राजकुमार डोंगरे, विश्र्वनाथ पवार, गंगाधर घुगे, राजू सिटीकर यांनी एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतला. या बालकाने दिलेल्या माहितीनुसार त्याने हनुमानगड भागातून एक दुचाकी चोरी केली आणि त्यानंतर मोजे येळेगाव येथे एका व्यक्तीला खंजीर दाखवून त्याच्याकडून रोख रक्कम लुटलीे. बालकाने सांगितल्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून ही चोरी केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी त्या बालकाकडून एक चोरीची दुचाकी आणि लुटलेली रोख रक्कम जप्त केली आहे. या बालकाला पकडल्यामुळे पोलीस ठाणे विमानतळ येथील गुन्हा क्रमांक 398/2024 आणि गुन्हा क्रमांक 531/2024 उघडकीस आले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी स्थानिक कुन्हा शाखेचे पेालीस निरिक्षक उदय खंडेराय आणि इतर पोलीसांचे कौतुक केले आहे.