नांदेड(प्रतिनिधी)-पोक्सो प्रकरणात पंच म्हणून बोलावल्यानंतर त्या व्यक्तीने नकर दिला म्हणून लोहा पोलीसांनी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लोहा येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजता लोहा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 326/2024 साठी पंचायत समिती लोहा येथील पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ सहाय्यक पी.व्ही.टरके यांना शासकीय पंच म्हणून या गुन्ह्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 376, 317 सह पोक्सो कायदा जोडलेला आहे. अर्थात गुन्हा गंभीर आहे. अशा गुन्ह्यांमध्ये शासकीय नोकरीत असलेल्या लोकांनाच पंच म्हणून काम करावे लागते असे शासनाचे निर्देश आहेत. परंतू टरके यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यास नकार दिला आणि दिलेल्या आदेशाची अवज्ञा केली. लोहा पोलीसांनी पी.व्ही.टरके विरुध्द भारतीय न्यायसंहितेच्या कलम 222, 223 नुसार गुन्हा क्रमांक 336/2024 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार बालाजी लाडेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.